२०१८-०७-२६

गीतानुवाद-११९: ये हवा, ये नदी का किनारा


मूळ हिंदी गीतकार: मजरूह सुलतानपुरी, संगीतः रवी, गायक: आशा-मन्ना डे

चित्रपटः घर संसार, सालः १९५८, भूमिकाः राजेंद्र कुमार, कुमकुम

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०२०४

धृ
ये हवा, ये नदी का किनारा
चाँद तारोंका रंगीं इशारा
कह रहा है, बेखबर
हो सके तो प्यार कर
ये समा मिलेगा फिर न दोबारा
ही हवा, हा नदीचा किनारा
चंद्र तार्‍यांचा रंगीत इशारा
म्हणतसे अरे अजाण
जमले तर तू प्रेम कर
हा ऋतू मिळेल ना तुला पुन्हा

ये रात ढलने न पाएँ
होने न पाएँ सवेरा
तू भी उठा लंबी पलके
जुल्फों को मैने बिखेरा
युँही चंदा तले
मेरी नैय्या चले
तेरी बाहों का लेके सहारा
ही रात्र संपो मुळी ना
होवो पहाटही मुळी ना
तू ही डोळे उघडून पहा
केसांना मी आहे विखुरले
अशीच चांदण्यातळी
माझी चाले होडी
तुझ्या बाहूंचा घेऊन सहारा

आजा पिया प्यारी हैं राते
गोरी आजा कर ले दो बाते
ऐसे मिले आज संया
तेरी नजर मेरी आँखे
धडकन मेरी तेरा दिल हो
लब हो मेरे, तेरी बाते
डरे काहे को दिल
सजना खुल के मिल
क्या करेगा जमाना हमारा
प्रियकरा ये ही रात संतोषवी
प्रिये ये करू या दोन गोष्टी
असा भेटला आज साजण
दृष्टी तुझी आणि हे नेत्र माझे
माझे स्पंदन हृदयी तव वसो
ओठ माझे करो तुझीच गूजे
भीते का मग हे मन
फुलून ये, भेट अन्
काय आमचे करेल हा जमाना





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.