मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः रोशन, गायक: रफी, रफी/लता
चित्रपटः बरसात की रात, सालः १९६०, भूमिकाः मधुबाला, भारतभूषण, निम्मी
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०८१८
॥
धृ
॥
|
जिंदगीभर नहीं
भुलेगी वो बरसात की रात
एक अन्जान हसीना
से मुलाकात की रात
|
जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात
अनोळखीशा सुंदरीच्या प्रथम भेटीची रात
|
॥
१
॥
|
हाय वो रेशमी
जुल्फों से बरसता पानी
फुल से गालों पे
रुकने को तरसता पानी
दिल में तुफान
उठाते हुए हालात की रात
जिंदगीभर नहीं
भुलेगी वो बरसात की रात
|
हाय ते रेशमी केसांतून बरसते पाणी
फुलशा गाली विहरण्याला उत्सुक ते पाणी
अंतरी वादळे जागवत्या घटनांचीती रात
जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात
|
॥
२
॥
|
डर के बिजली से
अचानक वो लिपटना उसका
और फिर शर्म से
बलखा के सिमटना उसका
कभी देखी न सुनी
ऐसी तिलिस्मात की रात जिंदगीभर नहीं भुलेगी वो बरसात की रात
|
भिऊन विजेला, अचानक ते बिलगणे
तीचे
आणि लाजेने चूर होऊन लोपणे तीचे
कधी न देखिली, न ऐकलीशी जादूभरी रात
जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात
|
॥
३
॥
|
सुर्ख आँचल को
दबाकर जो निचोडा उसने
दिल पे जलता हुआ
एक तीर सा छोडा उसने
आग पानी में लगाते
हुए जजबात की रात
जिंदगीभर नहीं
भुलेगी वो बरसात की रात
|
लाल पदराला, आवरून पिळले जे
तिने
हृदयी जळता जणू एक तीर सोडलेला तिने
आग पाण्यात लावणार्या भावनांची ती रात
जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात
|
॥
४
॥
|
मेरे नग्मों में
जो बसती है वो तस्वीर थी वो
नौजवानी के हसीं
ख्वाब की ताबीर थी वो
आसमानों से उतर आई
थी जो बात की रात जिंदगीभर नहीं भुलेगी वो बरसात की रात
|
वसते गीतात जी, माझ्या ती, तस्वीरशी ती
तरुणपणीच्या धुंद स्वप्नांतली सुंदरी ही ती
आसमानातून उतरलेल्या हितगुजाची ती रात जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात |
॥५॥
|
लता
जिंदगीभर नहीं
भुलेगी वो बरसात की रात
एक अन्जान मुसाफिर
से मुलाकात की रात
|
लता
जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात
अनोळखीशा प्रवाशाच्या प्रथम भेटीची रात
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.