| ॥ धृ ॥ |
तुम गगन के चंद्रमा हो
मै धरा की धूल हूँ तुम प्रणय के देवता हो मै समर्पित फूल हूँ तुम हो पूजा मै पुजारी तुम सुधा मै प्यास हूँ |
तू नभीचा चंद्रमा असशी धरेची धूळ मी तू प्रणय देवच तुझ्यावरती समर्पित फूल मी तूच पूजा, मी पुजारी तू सुधा अन् तहान मी |
| ॥ १ ॥ |
तुम महासागर की सीमा
मै किनारे की लहर तुम महासंगीत के स्वर मै अधुरी सांस पर तुम हो काया मै हूँ छाया तुम क्षमा मै भूल हूँ |
तू महासागर-किनारा अन् तटीची लाट मी तू महा संगीत-स्वर हे अन् अपूरा श्वास मी देह तू, तव सावली मी तू क्षमा अन् चूक मी |
| ॥ २ ॥ |
तुम उषा की लालिमा हो
भोर का सिंदूर हो मेरे प्राणो की हो गुंजन मेरे मन की मयूर हो तुम हो पुजा मै पुजारी तुम सुधा मै प्यास हूँ |
तू उषेचा लालिमा असशी उषेचे कुंकू तू माझ्या प्राणांचे तू गुंजन मनमयूरही तूच तू तूच पूजा, मी पुजारी तू सुधा अन् तहान मी |
मराठीत अनुवाद करणे हा माझा छंद आहे. अनुवादात, मूळ भाषेतील लिखाणात वर्णिलेल्या वास्तवाचे साक्षात अवतरण करण्याची कला मुळातच रंजक आहे. इंग्रजी, हिंदी, संस्कृत आणि उर्दू भाषांतून मी मराठीत भाषांतरे केलेली आहेत. मूळ साहित्य रचनेहूनही कित्येकदा अनुवादास अधिक कौशल्य लागत असते. म्हणूनच ही एक अभिजात कला आहे. इतर भाषांतील रस-रंजनाचा निर्झर मराठीत आणण्याचे हे काम आहे. रसिक वाचकास रुचेल तोच अनुवाद, चांगला उतरला आहे असे मानता येईल!
२०१६-१०-०९
गीतानुवाद-०८७: तुम गगन के चंद्रमा हो
२०१६-०९-२४
गीतानुवाद-०८६: पुकारता चला हूँ मै
॥
धृ
॥
|
पुकारता चला हूँ मै
गली गली बहार की
बस एक छॉव जुल्फ की
बस एक निगाह प्यार की
|
हाका
करीत, मी चाललो
गल्ली
बोळात, बहारीच्या
केसांची
तव, आरास बस
प्रेमाचा
एक, कटाक्ष बस
|
॥
१
॥
|
ये दिल्लगी ये शोखियाँ सलाम की
यही तो बात हो रही है काम की
कोई तो मुढ के देख लेगा इस तरफ
कोई नजर तो होगी मेरे नाम की
|
ही
मस्करी, ही ऐट अभिवादनी
होणारी
हीच बात मलाही भावली
कुणी
तरी वळून बघेल इथे जरी
नकळे
कटाक्ष कोणता, मला वरी
|
॥
२
॥
|
सुनी मेरी सदा तो इस यकीन से
घटा उतर के आ गयी जमीन पे
रही यही लगन तो ऐ दिल-ए-जवाँ
असर भी हो रहेगा इक हसीन पे
|
विश्वासुनी
माझ्या हाकेस ऐकता
निशाही
धावली त्वरीत धरेवरी
अशीच
राहिली जरी का भावना
पडेल
प्रभाव मम खचित परीवरी
|
२०१६-०८-११
गीतानुवाद-०८५: आपके हसीन रुखपे
|
धृ |
आप के हसीन रुख पे आज नया नूर है |
ग
तुझ्या सौंदर्यावरती आज नवे तेज आहे |
|
१ |
खुली लटों की छाव में खिला खिला ये रूप है |
खुल्या
बटांच्या सावलीत खुललेलं तुझं रूप आहे |
|
२ |
झुकी झुकी निगाह में भी है बला की शोखियाँ |
झुकत
जरी नजर, तिच्यात रम्य वीज आहे |
|
३ |
जहा जहा पड़े कदम वह फिजां बदल गयी |
पाऊल
पडे तुझे तिथे बदलले गं ऋतू आहेत |
२०१६-०७-३१
गीतानुवाद-०८४: तुम्हारी नज़र
॥
धृ
॥
|
रफी
तुम्हारी नज़र क्यों खफ़ा हो गई?
खता बख्श दो गर खता हो गई
लता
हमारा इरादा तो कुछ भी न था
तुम्हारी खता खुद सज़ा हो गई
|
रफी
कशाला नजर वद तुझी
कोपली?
क्षमा कर मला जर
चुकी जाहली
लता
न माझ्या मनी हेतू
कुठलाही होता
कुरापत तुझीच तुज
सज़ा जाहली
|
॥
१
॥
|
रफी
सज़ा ही सही आज कुछ तो मिला है
सज़ा में भी इक प्यार का सिलसिला है
मोहब्बत का कुछ भी अन्जाम हो
मुलाक़ात ही इल्तजा हो गई
|
रफी
सज़ा तर सजा, ती मला लाभली
सजेतही कथा
प्रीतीची व्यक्त झाली
परिणाम जो व्हायचा
तोच होवो
सुरूवात ह्या
हितगुजानेच झाली
|
॥
२
॥
|
लता
मुलाक़ात पे इतने मगरूर क्यों हो
हमारी खुशामद पे मजबूर क्यों हो
मनाने की आदत कहां पड़ गई
खताओं की तालीम क्या हो गई
|
लता
कशाला हवी ऐट ही
बोलण्याची
निकड का तुला
भासली आर्जवांची
सवय लागली ही कधी
आर्जवांची
कुठे शिकवणी गेली
भंडावण्याची
|
॥
३
॥
|
रफी
सताते न हम तो मनाते ही कैसे
तुम्हें अपने नज़दीक लाते ही कैसे
किसी दिन की चाहत अमानत ये थी
वो आज दिल की आवाज़ हो गई
|
रफी
सतावता न जर तर
कसा विनवता मी जवळिक तुझ्याशी कसा साधता मी
मनीषा मनी ह्या
दिसाचीच होती मनोप्रार्थना साधली आजला ती
|
॥
४
॥
|
लता
सजा कुछ भी दो पर, खता तो बता दो
मेरी बेगुनाही का, कुछ तो सिला दो
मेरे दिल के मालिक, मेरे देवता
बस अब जुल्म की, इम्तिहाँ, हो गई
|
लता
सजा दे, परी अपराध सांग
माझा
निष्पाप मी, ते मला श्रेय दे
ना
मनोस्वामी तू, तू माझी देवता
पुरे क्लेश हे, सोसती हे न आता
|
२०१६-०७-०७
गीतानुवाद-०८३: चेहरे पे ख़ुशी छा जाती है
॥
धृ
॥
|
चेहरे पे ख़ुशी छा जाती है
आँखों में सुरूर आ जाता है
जब तुम मुझे अपना कहते हो
अपने पे ग़ुरूर आ जाता है
|
चेहर्याची कळी खुलते पटकन
नेत्रांत लकाकीही येते
जेव्हा तू मला आपली म्हणसी
स्वतःचेच कौतुक वाटते
|
॥
१
॥
|
तुम हुस्न की ख़ुद एक दुनिया
हो शायद ये तुम्हें मालूम नहीं
महफ़िल में तुम्हारे आने से हर
चीज़ पे नूर आ जाता है
|
सौंदर्याची दुनिया तू पुरी
हे बहुधा तुला माहीत नसे
सोहळ्यात, तुझ्या आगमनाने
हर वस्तू जणू तेजे भरते
|
॥
२
॥
|
हम पास से तुमको क्या देखें
तुम जब भी मुक़ाबिल आते हो
बेताब निगाहों के आगे परदा
सा ज़रूर आ जाता है
|
मी पाहू कसे जवळून तुजला
येशी तू समोर जेव्हा केव्हा
होऊन अधीर, नयनांपुढती
पडदासाच येतो मात्र खरे
|
॥
३
॥
|
जब तुमसे मुहब्बत की हमने
तब जा के कहीं ये राज़ खुला
मरने का सलीका आते ही
जीने का शऊर आ जाता है
|
केली मी प्रीत तुझ्यावरती
तेव्हाच हे रहस्य उलगडले
मरण्याच्या रीती कळून येता
जगण्याचे रहस्यही आकळते
|
२०१६-०६-०७
गीतानुवाद-०८२: देखती ही रहो
मूळ हिंदी गीत: नीरज, संगीत: रोशन, गायक: मुकेश
चित्रपट: नयी उम्र की नयी फसल, सालः १९६६,
भूमिकाः तनुजा, राजीव
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००४१०१८
