२०१६-०७-३१

गीतानुवाद-०८४: तुम्हारी नज़र

मूळ हिंदी गीतकार: साहिर लुधियानवी, संगीतः रवी, गयक: रफी, लता
चित्रपटः दो कलियाँ, सालः १९६८, भूमिकाः विश्वजीत, माला सिन्हा, नितू सिंग
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७१०१०
धृ
रफी
तुम्हारी नज़र क्यों खफ़ा हो गई?
खता बख्श दो गर खता हो गई
लता
हमारा इरादा तो कुछ भी न था
तुम्हारी खता खुद सज़ा हो गई
रफी
कशाला नजर वद तुझी कोपली
क्षमा कर मला जर चुकी जाहली
लता
न माझ्या मनी हेतू कुठलाही होता
कुरापत तुझीच तुज सज़ा जाहली

रफी
सज़ा ही सही आज कुछ तो मिला है
सज़ा में भी इक प्यार का सिलसिला है
मोहब्बत का कुछ भी अन्जाम हो
मुलाक़ात ही इल्तजा हो गई
रफी
सज़ा तर सजा, ती मला लाभली
सजेतही कथा प्रीतीची व्यक्त झाली
परिणाम जो व्हायचा तोच होवो
सुरूवात ह्या हितगुजानेच झाली


लता
मुलाक़ात पे इतने मगरूर क्यों हो
हमारी खुशामद पे मजबूर क्यों हो
मनाने की आदत कहां पड़ गई
खताओं की तालीम क्या हो गई

लता
कशाला हवी ऐट ही बोलण्याची
निकड का तुला भासली आर्जवांची
सवय लागली ही कधी आर्जवांची
कुठे शिकवणी गेली भंडावण्याची


रफी
सताते न हम तो मनाते ही कैसे
तुम्हें अपने नज़दीक लाते ही कैसे
किसी दिन की चाहत अमानत ये थी
वो आज दिल की आवाज़ हो गई

रफी
सतावता न जर तर कसा विनवता मी जवळिक तुझ्याशी कसा साधता मी
मनीषा मनी ह्या दिसाचीच होती मनोप्रार्थना साधली आजला ती


लता
सजा कुछ भी दो पर, खता तो बता दो
मेरी बेगुनाही का, कुछ तो सिला दो
मेरे दिल के मालिक, मेरे देवता
बस अब जुल्म की, इम्तिहाँ, हो गई

लता
सजा दे, परी अपराध सांग माझा
निष्पाप मी, ते मला श्रेय दे ना
मनोस्वामी तू, तू माझी देवता
पुरे क्लेश हे, सोसती हे न आता




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.