मूळ
हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः रवी, गायकः महेंद्र कपूर
चित्रपटः
हमराज, सालः १९६७, भूमिकाः सुनील दत्त, विम्मी
मराठी
अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०७१७
|
धृ
|
किसी पत्थर की मूरत से मुहब्बत का इरादा है परस्तिश की तमन्ना है इबादत का इरादा है
|
कुणा
दगडाच्या मूर्तीवर प्रेम
करण्याची इच्छा आहे अर्चना
करण्याची इच्छा आहे पुजा
करण्याची मनीषा आहे
|
|
१
|
जो दिल की धड़कनें समझे न आँखों की ज़ुबाँ समझे नज़र की गुफ़्तगू समझे न जज़बों का बयाँ समझे उसी के सामने उसकी शिक़ायत का इरादा है
|
जी
न हृदस्पंद समजू शके न
जी नेत्रांची बोलीही समजे गूज
डोळ्यातील ना जाणे न
भावना काय ते जाणे तिच्या
समोरच तिच्या तक्रारीची
कांक्षा आहे
|
|
२
|
सुना है हर जवाँ पत्थर के दिल में आग होती है मगर जब तक न छेड़ो शर्म के पर्दे में सोती है ये सोचा है की दिल की बात उसके रूबरू कह दे नतीजा कुछ भी निकले आज अपनी आरज़ू कह दे हर इक बेजाँ तक़ल्लुफ़ से बग़ावत का इरादा है
|
ऐकलेले
युवा मूर्तीच्या हृदयीही
भावना फुलती तरीही
साद ना देता त्या लाजेच्या
पड्द्यातची राहती केला
विचार मी की गोष्ट मनीची
थेट सांगू तिला पुढे
मग काहीही होवो मनोरथ
सांगू या तिजला हरेकच
निष्प्राण ओळखीशी लढा
देण्याची मनीषा आहे
|
|
३
|
मुहब्बत बेरुख़ी से और भड़केगी वो क्या जाने तबीयत इस अदा पे और फड़केगी वो क्या जाने वो क्या जाने कि अपना किस क़यामत का इरादा है
|
तुसडेपणाने
प्रीत आणखीही भडकेल
ना समजे ती चित्तही
अशा लकबीने आणखी
चेतेल ना जाणे काय
माहीत तिला की हेतू
कसल्या प्रलयाचा आहे
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.