२०१६-०९-२४

गीतानुवाद-०८६: पुकारता चला हूँ मै

 गीतकार: मजरूह, संगीतः ओ.पी.नय्यर, गायक: रफी
चित्रपटः मेरे सनम, सालः १९६५, भूमिकाः विश्वजीत, आशा पारेख

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००४०६२४



धृ
पुकारता चला हूँ मै
गली गली बहार की
बस एक छॉव जुल्फ की
बस एक निगाह प्यार की
हाका करीत, मी चाललो
गल्ली बोळात, बहारीच्या
केसांची तव, आरास बस
प्रेमाचा एक, कटाक्ष बस

ये दिल्लगी ये शोखियाँ सलाम की
यही तो बात हो रही है काम की
कोई तो मुढ के देख लेगा इस तरफ
कोई नजर तो होगी मेरे नाम की
ही मस्करी, ही ऐट अभिवादनी
होणारी हीच बात मलाही भावली
कुणी तरी वळून बघेल इथे जरी
नकळे कटाक्ष कोणता, मला वरी

सुनी मेरी सदा तो इस यकीन से
घटा उतर के आ गयी जमीन पे
रही यही लगन तो ऐ दिल-ए-जवाँ
असर भी हो रहेगा इक हसीन पे
विश्वासुनी माझ्या हाकेस ऐकता
निशाही धावली त्वरीत धरेवरी
अशीच राहिली जरी का भावना
पडेल प्रभाव मम खचित परीवरी




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.