मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर-जयकिसन, गायकः लता, रफी
चित्रपटः दिल तेरा दिवाना, सालः १९६२, भूमिकाः शम्मी कपूर,
माला सिन्हा
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०८१४
|
प्र
स्ता
व
|
बिजली गिराके आप ख़ुद बिजली से डर गए हम सादगी पे आपकी लिल्लाह मर गए हाय, हाय,
हाय
|
वीज पाडून तू स्वतः विजेलाच घाबरलीस साधेपणावरती तुझ्या साजणे जीवन वाहिले हाय,
हाय, हाय
|
|
धृ
|
दिल तेरा दीवाना है सनम जानते हो तुम कुछ ना कहेंगे हम मोहब्बत की कसम मोहब्बत की कसम
|
मन माझे खुळे आहे तुझे जाणशी ते तू काही ना म्हणेन मी प्रेमाची शप्पथ प्रेमाची शप्पथ
|
|
१
|
प्यार के अलबेले ये हमसफ़र चल देंगे ले जाएगा दिल जिधर राह में खो जाएँगे आज तो मंज़िल कहाँ है हमें क्या
ख़बर कुछ चाहत का असर कुछ मौसम का असर
|
प्रेमातील आगळे आम्ही सोबती जाऊ घेऊन जाईल मन जिथे आज तर हरवून जाऊ वाटेतच गंतव्य आम्हाला ना माहिती काहीसे आवडीने काहीसे ऋतूमुळे
|
|
२
|
तेरी आँख मे जो सरूर है सारा इसीका तो क़सूर है सैयाँ अंजानी नगरी प्यार की नादान यह दिल मेरा मजबूर है जीवन मे एक बार खुद हो जाता है प्यार
|
डोळ्यांत तुझ्या जे तेज आहे चूक त्याचीच सारी आज आहे पाहिलेली ना नगरी प्रीतीची वेडे मन अगतिक आज आहे जीवनात एकच वार प्रीत होते ना स्वतःच
|
|
३
|
क्या कीजे कोई मन भा गया दिल मे हमारे वह समा गया हंस के किसी ने देखा एक बार दिल की मुरादे कोई पा गया सांसो मे मीठी आग होठो पे मीठा राग
|
काय करू कुणी मनास भावले मनात ते आले, रुजले, राहले हसून पाहिले कुणी एकदाच ईप्सिते मनची त्याला लाभली श्वासांत गोडशी आग ओठांवर खोटा राग
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.