२०२१-०८-१०

गीतानुवाद-२२२: लग जा गले

मूळ हिंदी गीतकारः राजा मेहंदी अली खान, संगीतः मदनमोहन, गायीकाः लता
चित्रपटः वह कौन थी, सालः १९६३, भूमिकाः मनोजकुमार, साधना 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०८१५

धृ

लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

जवळी मला धरी ही रात्र ये न ये पुन्हा
बहुधा न होऊ दे या जन्मी भेटही पुन्हा

हमको मिली हैं आज, ये घड़ियाँ नसीब से
जी भर के देख लीजिये हमको क़रीब से
फिर आपके नसीब में ये बात हो न हो

हाती मिळाली आज ही घटिका सुदैवाने
जवळून घे बघून मनसोक्त तू सुखे
मग आपल्या नशीबी हे सुख ये न ये पुन्हा

पास आइये कि हम नहीं आएंगे बार-बार
बाहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार
आँखों से फिर ये प्यार कि बरसात हो न हो

ये जवळ न मी पुन्हा येणार वारंवार
घालुन गळा गळ्यात रडू आज धायधाय
डोळ्यांतूनी हे प्रेम बरसो न वा पुन्हा

 https://www.youtube.com/watch?v=TFr6G5zveS8

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.