२०२१-०८-०७

गीतानुवाद-२१९: अफ़साना लिख रही हूँ

मूळ हिंदी गीतः शकील बदायुनी, संगीतः नौशाद, गायिकाः उमादेवी
चित्रपटः दर्द, सालः १९४७, भूमिकाः सुरैय्या, मुनव्वर सुलतान 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१३१२१८



धृ

अफ़साना लिख रही हूँ अफ़साना लिख रही हूँ
दिल-ए-बेक़रार का
आँखोँ में रंग भर के तेरे इंतज़ार का
अफ़साना लिख रही हूँ

स्वगतच लिहिते आहे स्वगतच लिहिते आहे
या अस्वस्थ मनाचे
डोळ्यांत भरूनी रंग हे तुझ्या प्रतीक्षेचे
स्वगतच लिहिते आहे



जब तू नहीं तो कुछ भी नहीं है बहार में
नहीं है बहार में
जी चाहता है मूँह भी
जी चाहता है मूँह भी न देखूँ बहार का
आँखोँ में रन्ग भर के तेरे इंतज़ार का

तू नसता ही निरस, असे बहार सर्वही
असे बहार सर्वही
वाटे मला मी पाहू ना
वाटे मला मी पाहू ना  मुख या बहारीचे
डोळ्यांत भरूनी रंग हे तुझ्या प्रतीक्षेचे



हासिल हैं यूँ तो मुझको ज़माने की दौलतें
ज़माने की दौलतें
लेकिन नसीब लाई
लेकिन नसीब लाई हूँ इक सोग़वार का
आँखोँ में रन्ग भर के तेरे इंतज़ार का

हाताशी आहे सर्व जगाची ही संपदा
जगाची ही संपदा
नशीब घेतले मात्र
नशीब घेतले मात्र शोकाकूल व्यक्तीचे
डोळ्यांत भरूनी रंग हे तुझ्या प्रतीक्षेचे



आजा कि अब तो आँख में आँसू भी आ गये
आँसू भी आ गये
साग़र छलक उठा
साग़र छलक उठा मेरे सब्र-ओ-क़रार का
आँखोँ में रन्ग भर के तेरे इंतज़ार का

आता तरी तू ये, आले अश्रूही दाटूनी
आले अश्रूही दाटूनी
बुरूज ढळू पाहती
बुरूज ढळू पाहती माझ्या धैर्यशक्तीचे
डोळ्यांत भरूनी रंग हे तुझ्या प्रतीक्षेचे


https://www.youtube.com/watch?v=D7XJy4bSNRY

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.