मूळ हिंदी गीतः प्रेम धवन, संगीतः सलील चौधरी, गायकः मन्ना
डे
चित्रपटः काबुलीवाला, सालः १९६१, भूमिकाः बलराज सहानी,
उषा किरण
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०८०७
धृ
|
ऐ मेरे प्यारे वतन ऐ
मेरे बिछड़े चमन तुझ पे दिल कुर्बान ही मेरी आरजू तू
ही मेरी आबरू तू ही मेरी जान
|
आवडत्या स्वदेशा तू ए विलगलेल्या फुला तुजसी अर्पण प्राण तूच आवडही माझी तू प्रतिष्ठाही माझी तूच माझा प्राण
|
१
|
तेरे दामन से जो आये
उन हवाओं को सलाम चूम लूँ मैं उस
ज़ुबां को जिसपे आये तेरा नाम सब से प्यारी सुबह
तेरी सब से रंगीं
तेरी शाम
|
स्वदेशावरूनी जी हवा ये त्या हवेलाही प्रणाम चुंबू वाणी जीवरी ये रे स्वदेशाचेच नाव सकाला सर्वोत्तम तुझी सर्वात रंगीत तुझीच सांज
|
२
|
माँ का दिल बनके कभी
सीने से लग जाता है तू और कभी नन्ही सी
बेटी बनके याद आता है तू जितना याद आता है
मुझको उतना तड़पाता है तू
|
आईचे काळीज बनून कधी छातीला तू स्पर्शसी आणि कधी छोटीशी मुलगी होऊनी आठवशी तू जेवढा आठवशी तू तितकाच तळमळवसी तू
|
३
|
छोड़कर तेरी ज़मीन
को दूर आ पहुचे हैं हम फिर भी है यही
तमन्ना तेरे जर्रों की कसम हम जहाँ पैदा हुये
उस जगह ही निकले दम
|
सोडूनी भूमी तुझी मी खूप दूर आलो आहे तरीही माझी हीच इच्छा तव धुळीची रे शपथ जन्मलो मी जेथ तेथे प्राण जावो रे खरच
|
https://www.youtube.com/watch?v=jDdlOoysg4s
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.