२०२१-०८-०१

गीतानुवाद-२१८: ऐ मालिक तेरे बंदे हम

मूळ हिंदी गीतः भरत व्यास, संगीतः वसंत देसाई, गायकः मन्ना डे लता
चित्रपटः दो आँखे बारा हात, सालः १९५७, भूमिकाः व्ही. शांताराम, संध्या 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०९०६

धृ

ऐ मालिक तेरे बंदे हम
ऐसे हो हमारे करम
नेकी पर चलें
और बदी से टलें
ताकि हंसते हुए निकले दम

ए स्वामी सेवक तव आम्ही
करू कामे अशी नेहमी
नेकीने चलू
वाईटा दूर करू
ज्याने हसतच जाईल प्राणही

बड़ा कमज़ोर है आदमी
अभी लाखों हैं इसमें कमीं
पर तू जो खड़ा
है दयालू बड़ा
तेरी किरपा से धरती थमी
दिया तूने हमे जब जनम
तू ही झेलेगा हम सबके ग़म

आहे असमर्थ मानव किती
ह्यात लाखो उणीवा तरी
पण तू जो उभा
आहेस दयाळू खरा
तुझ्या कृपेवरती स्थिर ही जमीन
जन्म तू आहेस आम्हाला दिला
तूच हरशील ही दुःखे सदा

ये अंधेरा घना छा रहा
तेरा इनसान घबरा रहा
हो रहा बेखबर
कुछ न आता नज़र
सुख का सूरज छुपा जा रहा
है तेरी रोशनी में वो दम
जो अमावस को कर दे पुनम

अंधार हा गडद होत आहे
तुझा माणूस घाबरत आहे
होत तो बेखबर
ये न काही नजर
सौख्यसूर्यही लपू लागला
आहे दीप्तीमध्ये तव जो दम
अमावस्येला करतो पुनव

जब ज़ुल्मों का हो सामना
तब तू ही हमें थामना
वो बुराई करें
हम भलाई भरें
नहीं बदले की हो कामना
बढ उठे प्यार का हर कदम
और मिटे बैर का ये भरम

जेव्हा जुलुमांचा हो सामना
तेव्हा तू हात धर आमचा
ते करोत वाईटही
जे भले तेच करू
न हो सूडाची कधी कामना
पाऊल प्रेमाचे हर हो पुढे
आणि वैराचे भ्रम संपू दे

 

https://www.youtube.com/watch?v=fFc9TMxRbQg

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.