२०२१-०८-११

गीतानुवाद-२२३: तुम से इज़हार-ए-हाल कर बैठे

मूळ हिंदी गीतकारः शकील, संगीतः नौशाद, गायकः रफी
चित्रपटः मेरे मेहबूब, सालः १९६३, भूमिकाः राजेंद्र कुमार, साधना, अमिता, अशोककुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१००१०९

प्रस्ताव

आज फ़ुरकत का ख्वाब टूट गया
मिल गये तुम हिजाब टूट गया

विरहातील हे स्वप्न आज भंगले
भेटलीस तू, पडदेही सर्व संपले

धृ

तुम से इज़हार-ए-हाल कर बैठे
बेखुदी में कमाल कर बैठे

मनावस्था मी तुला कबूल केली
बेहोशीतच कमाल जणू केली

खो गये हुस्न की बहारों में
कह दिया राज़-ए-दिल इशारों में
काम हम बेमिसाल कर बैठे

हरवलो मी सौंदर्य बहरांतच
गूज सांगितले माझे इशार्‍यात
अनुपमेय मी ही कृती केली

कितने मजबूर हो गये दिल से
सोचे समझे बगैर क़ातिल से
ज़िन्दगी का सवाल कर बैठे

किती असहाय्य झालो मी मनाने
न विचार करताच, रूपगर्वितेला
प्रश्न आयुष्याचा कशास केला

ये अदाएं ये शोखियां तौबा
बस खुदा ही खुदा है उस दिल का
जो तुम्हारा खयाल कर बैठे

या लकबी हे नखर्‍यांचे कहर
फक्त ईश्वरच आधार त्या मनाला
जो विचार तुझाच करू पाहे

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=CGE1RUmHjRM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.