२०२१-०८-३०

गीतानुवाद-२२८: जीना यहाँ मरना यहाँ

मूळ हिंदी गीतः शैली शैलेंद्र, संगीतः शंकर-जयकिशन, गायकः मुकेश
चित्रपटः मेरा नाम जोकर, सालः १९७०, भूमिकाः राज कपूर, सिम्मी ग्रेवाल 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०८३०


धृ

जीना यहाँ मरना यहाँ
इसके सिवा जाना कहाँ
जी चाहे जब हमको आवाज़ दो
हम हैं वहीं हम थे जहाँ
जीना यहाँ मरना यहाँ
इसके सिवा जाना कहाँ

जगणे इथे मरणे इथे
सोडून हे जायचे कुठे
हवे तेव्हा तू मला आवाज दे
मी आहे तिथेच होतो जिथे
जगणे इथे मरणे इथे
सोडून हे जायचे कुठे

ये मेरा गीत जीवन संगीत
कल भी कोई दोहरायेगा
जग को हँसाने बहरूपिया
रूप बदल फिर आयेगा
स्वर्ग यहीं नर्क यहाँ
इसके सिवा जाना कहाँ

हे माझे गीत जीवन संगीत
उद्यालाही कोणी गाईलही
हसवायला जगाला पुन्हा
बहुरूपी येईल बदलून रूप
स्वर्ग इथे नर्क इथे
सोडून हे जायचे कुठे

कल खेल में हम हों न हों
गर्दिश में तारे रहेंगे सदा
भूलोगे तुम, भूलेंगे वो
पर हम तुम्हारे रहेंगे सदा
होंगे यहीं अपने निशाँ
इसके सिवा जाना कहाँ 

खेळात उदा नसेनही मी
आकाशी तारे राहतील सदा
विसरशील तू, विसरतील ते
तरीही तुझा मी राहीन सदा
असतील इथे आपल्या खुणा
सोडून हे जायचे कुठे

https://www.youtube.com/watch?v=sI7WLg21i80

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.