२०२१-०८-२९

गीतानुवाद-२२७: मस्तीभरा है समा

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः दत्ताराम वाडकर, गायकः लता, मन्ना डे
चित्रपटः परवरिश, सालः १९५८, भूमिकाः राज कपूर, माला सिन्हा

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०८२९

धृ

मस्ती भरा है समां
हम तुम है दोनों यहां
आँखों में आजा
दिल में समां जा
झूमे जमीं आसमान

मस्ती भरे आज का
दोघेही इथेच आहो ना
डोळ्यांत ये ना
हृदी रहा ना
नाचे जमीन आसमान

नीली आँख मिला लो जी
दिल में आज छुपा लो जी
बाहों में बाहें डाले जी
गिर न जाए संभालो जी
भीगी हवाओ में
ऐसी फिजाओ में
होश मुझे कहाँ

नीळी नजर भिडव ना
हृदयी आत लपव ना
बाहूंचे हार तू घाल ना
पडतो, जरा सांभाळ ना
सर्द हवेमध्ये
अशा बहारीत
शुद्ध कुठे आहे मला

प्यार से प्यार सजाये चल
मनन की प्यास बुझाए चल
प्यार का राग सुनाये चल
दिल का साज बजाये चल
पच्छी भी गाएंगे
सबको सुनायेंगे
तेरी मेरी दास्ताँ

प्रेमाने प्रेम फुलव ना
तहान मनीची भागव ना
प्रेमाचे गीत ऐकव ना
हृदीचे स्पंद वाजव ना
पक्षीही गातील
सर्वा ऐकवतील
तुझीमाझी ही कथा

 

https://www.youtube.com/watch?v=fbXiAJT4Bzs

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.