२०२१-०८-१३

गीतानुवाद-२२५: लिखे जो खत तुझे

मूळ हिंदी गीतः नीरज, संगीतः शंकर जयकिसन, गायकः मोहम्मद रफी
चित्रपट: कन्यादान, सालः १९६९, कलाकारः शशी कपूर, आशा पारेख

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१२०३३०

धृ

लिखे जो खत तुझे, वो तेरी याद में
हजारो रंग के, नजारे बन गये
सवेरा जब हुआ, तो फूल बन गये
जो रात आई तो सितारे बन गये

पत्रे जी लिहिली, सयीने तुझ्या ती
हजारो रंगांची दृश्ये ती जाहली
पहाट होतांना फुले ती जाहली
अन्‌ रात होतांना तारे ती जाहली

कोई नगमा कहीं गुंजा
कहाँ दिल में ये तू आई
कही चटकी कली कोई
मैं ये समझा तू शरमाई
कोई खुषबू कहीं बिखरी
लगा ये जुल्फ लहराई

कुठे गुंजे कसे गीत अन्‌
कुठे मनात तू आलीस
कुठे गळली कळी कुठली
मला वाटे तू लाजलीस
कसा दरवळ कुठे विखुरे
असे वाटे बटा लहरे

फिजा रंगीं अदा रंगीं
ये इठलाना ये शरमाना
ये अंगडाई ये तनहाई
ये तरसाकर चले जाना
भला देखा नहीं किस को
जवाँ जादू ये दिवाना

ऋतू रंगीत लकब रंगीत
तुझे वळणे, हे लाजणे
तुझी गिरकी, तुझा विरह
तुझे ते सोडूनी जाणे
कुणाला पाहवे ना ही
युवा जादू खुळावणारी

जहाँ तू हैं वहाँ मैं हूँ
मेरे दिलकी तू धडकन हैं
मुसाफिर मैं तू मंझिल हैं
मैं प्यासा हूँ तू सावन हैं
मेरी दुनिया ये नजरे हैं
मेरी जन्नत ये दामन हैं

जिथे तू अस तिथे मीही
मम हृदीचे स्पंदन तू अस
प्रवासी मी, तू गंतव्यच
मी तहानेला, तू श्रावण अस
माझे जग हे ह्या नजरेतच
माझा स्वर्गही तुझ्या ओटीत

https://www.youtube.com/watch?v=vTQkB6MvKZc

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.