२०२३-०७-०६

गीतानुवाद-२७५: दिल लगाकर हम ये समझे

मूळ हिंदी गीतः शकील बदायुनी, संगीतः सी. रामचंद्र, गायकः आशा भोसले
चित्रपटः जिंदगी और मौत, सालः १९६५, भूमिकाः प्रदीपकुमार, उमा दत्त, बेला बोस 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०७०५

धृ

दिल लगाकर हम ये समझे
ज़िंदगी क्या चीज़ है
इश्क़ कहते है किसे
और आशिक़ी क्या चीज़ है

जीव जडवून मी समजलो
काय हे जीवन असे
प्रेम म्हणती कशाला
प्रेम करणे काय असे

हाय ये रुखसार के शोले
ये बाहें मरमरी
आपसे मिलकर ये दो बातें
समझ मे आ गयी
धूप किसका नाम हैं और
चाँदनी क्या चीज़ हैं

हाय सौंदर्याचे निखारे
हे हातही कोमल किती
भेटून तुला दोन्हीही हे
नीट आकळले मला
ऊन संबोधन कशाचे
चांदणे हे काय असे

आपकी शोखी ने क्या क्या
रूप दिखलाए हमे
आपकी आँखो ने क्या क्या
जाम पिलवाए हमे
होश खो बैठे तो जाना
बेखुदी क्या चीज़ है

दाविली तव चपलतेने
रूपं कसकसली मला
नेत्रांनी तव पाजलेले
चषक कसकसले मला
हरपली ती शुद्ध तेव्हा
काय बेहोशी कळे

आपकी राहों में जबसे
हमने रखा है क़दम
हमको ये महसूस होता
है कि हैं मंज़िल पे हम
कोई क्या जाने मोहब्बत
की खुशी क्या चीज़ है

ठेवली मी पावले
जेव्हा तुझ्या वाटेवरी
अनुभवाला हेच आले
मजसी ईप्सित लाभले
ठाऊक कुणा होई कशाला
प्रेम किती आनंदमय

बाद मुद्दत के मिले तो
इस तरह देखा मुझे
जिस तरह एक अजनबीपर
अजनबी डाले नज़र
आपने ये भी न सोचा
दोस्ती क्या चीज़ है

भेटलो कालांतराने
तो पाहिले ऐसे मला
अनोळखी व्यक्तीस भेटे
जणू कुणी अज्ञातसा
विचार तू केलासही ना
मित्रता ही काय असे

पहले-पहले आप ही
अपना बना बैठे हमें
फिर न जाने किसलिए
दिल से भुला बैठे हमें
अब हुआ मालूम हमको
बेरुख़ी क्या चीज़ है

अगदी सुरवातीस तू
आपलेसे केलेसी मला
मग न जाणे का कळेना
विसरलासही तू मला
कळे आता मजसी की
तुटकता ती काय असे

प्यार सच्चा है मेरा तो
देख लेना ऐ सनम
आप आकर तोड़ देंगे
ख़ुद मेरी ज़ंजीर-ए-ग़म
बन्दा पर्वर जान लेंगे
बन्दगी क्या चीज़ है

प्रेम माझे जर खरे तर
पाहशील तूही प्रिया
तूच येऊन तोडशीलही
दुःखसाखळी तू स्वतः
मग मला समजेल हे की
बंधने ही काय असत


२०२३-०६-२९

गीतानुवाद-२७४: You have to go where life takes you

“Looking back at my life's voyage, I can only say that it has been a golden trip”.
- Ginger Rogers, as quoted in

Dr. Suresh Haware’s “My BARC Days”, Rohan Prakashan,
22 April 2023, PP-195, Rs.399/-

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०६२८

धृ

You have to go
where life takes you

मात्र जावं तिथेच लागतं
जिथे आयुष्य नेईल

I’ll do this and I’ll do that
I’ll go here and I’ll go there too
You have to go
where life takes you

मी हे करेन, मी ते करेन
मी इथे जाईन, मी तिथेही जाईन
मात्र जावं तिथेच लागतं
जिथे आयुष्य नेईल

You may paint and repent in life
You may succeed or fail through
You have to go
where life takes you

स्वप्न रंगवा, पश्चात्ताप करा
यशस्वी व्हा किंवा नका होऊही
मात्र जावं तिथेच लागतं
जिथे आयुष्य नेईल

You may plan and re-plan
You may design a future for you
You have to go
where life takes you

नियोजन करा, पुनर्नियोजनही
भवितव्याचे अभिकल्पनही होईल
मात्र जावं तिथेच लागतं
जिथे आयुष्य नेईल

You may turn inside out
and upside down
You may learn a heavy lesson too
You have to go
where life takes you

करा आतबाहेर
करा उलटसुलट
अवघड धडाही शिकला जाईल
मात्र जावं तिथेच लागतं
जिथे आयुष्य नेईल

Happy or sad
worried or mad
World doesn’t look at you
You have to go
where life takes you

सुखी असा वा दुःखी
सचिंत असा वा खुळे
जग काही तुमच्याकडे पाहत नाही
मात्र जावं तिथेच लागतं
जिथे आयुष्य नेईल

You may see a ruthless world
That may try to ruin you
You have to go
where life takes you

तुम्ही पाहताय ते निष्ठूर जग
मोडून टाकायला बघते नेहमीच
मात्र जावं तिथेच लागतं
जिथे आयुष्य नेईल

You may, may not agree
to destiny’s choice
You may fight and struggle
all along through
You have to go
where life takes you

दैवाच्या निवडीशी
सहमत असा वा नसा
लढा देत रहा आणि
करा संघर्षही
मात्र जावं तिथेच लागतं
जिथे आयुष्य नेईल

Someone may help
someone may pain you
There is almighty to punish through
You have to go
where life takes you

कुणी मदत करेल
कुणी त्रास देईल
सर्वशक्तीमान त्याला शासन करील
मात्र जावं तिथेच लागतं
जिथे आयुष्य नेईल

Happiness lies not without
but within you
If not to perish
Perform must you
You have to go
where life takes you

सुख तुमच्याविना नाही
ते असते तुमच्या ठायी
नामशेष व्हायचे नसेल
तर कर्माला पर्याय नाही
मात्र जावं तिथेच लागतं
जिथे आयुष्य नेईल

२०२३-०६-०३

गीतानुवाद-२७३: आ जा रे परदेसी

मूळ हिंदी गीतकारः शैलेंद्र, संगीतः सलील चौधरी, गायकः लता
चित्रपटः मधुमती, सालः १९५८, भूमिकाः दिलीपकुमार, वैजयंतीमाला, प्राण 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०८०५

धृ

आ जा रे ऽऽऽ परदेसी
मैं तो कब से खड़ी इस पार
ये अँखियाँ, थक गई पंथ निहार
आ जा रे ऽऽऽ परदेसी

ये रे ये जरी न देशी तू
मी तर कधीची उभी पार इथे
हे नेत्रही, थकले पाहुन वाट रे
ये रे ये जरी न देशी तू

तुम संग जनम जनम के फेरे
भूल गये क्यूँ साजन मेरे
तड़पत हूँ मैं सांझ सवेरे,
आ जा रे ऽऽऽ परदेसी

तुजसंग जन्म जन्मीचे फेरे
विसरलास का प्रियतम तू रे
झुरत असे मी रात्रंदिन रे,
ये रे ये जरी न देशी तू

मैं नदिया फिर भी मैं प्यासी
भेद ये गहरा बात ज़रा सी
बिन तेरे हर रात उदासी,
आ जा रे ऽऽऽ परदेसी

मी नदी असुनी तहानली रे
गूढ हे गहिरे गोष्ट सरळशी
तुजविण सजणा रात्र उदासी,
ये रे ये जरी न देशी तू

मैं दिये की ऐसी बाती
जल न सकी जो बुझ भी न पाती
आ मिल मेरे जीवन साथी,
आ जा रे ऽऽऽ परदेसी

मी दिव्याची वातच असली
उजळलीही ना, विझूही शकली
भेट मला तू, सोबत खरी रे,
ये रे ये जरी न देशी तू

२०२३-०५-३१

गीतानुवाद-२७२: ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे

मूळ हिंदी गीत: आनंद बख्शी, संगीत: कल्याणजी-आनंदजी, गायक: रफी, सुमन कल्याणपूर
चित्रपट: जब जब फुल खिले, साल: १९६५, भूमिका: शशी कपूर, नंदा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०९१६

धृ

ना ना करते, प्यार तुम्ही से कर बैठे
करना था इन्कार, मगर इक़रार
तुम्हीं से कर बैठे

सु:

ना ना म्हणता, प्रेम तुझ्यावर मी केले
नव्हता मनी होकार, तरी होकार,
तुला देऊन बसले

 

हम को है पता
जो तुम्हारी दास्ताँ थी
होंठों पे तो ना थी
जा झूठे !
होंठों पे तो थी
मगर दिल में हाँ थी
कोई दिल देगा
अनाड़ी अनजान को
हमने दे दिया है
तो मानो एहसान को
हम भूले इक बार, कि आँखें चार
तुम्हीं से कर बैठे

मो:



सु
:
मो:
सु:

कहाणीची तुझ्या
माहिती मला होती
ओठांवर ना होते
जा खोटारड्या !
ओठांवर ना होते,
पण हो होते अंतरी
कोणी जिव ना जडवेल,
अडाणी, अनोळख्याशी
जीव दिला मी तुजला
त्या मान उपकारासी
चुकले मी एक वार, दृष्टिव्यवहार
तुझ्यासव मी केले

छोड़ो रहने भी दो
ये झूठे अफ़साने
ऐसा क्या है तुम में
जा झूठी !
ऐसा क्या है तुम में
कि हम हो दीवाने
फिर भी तुमने ख़्वाबों में
आना नहीं छोड़ा
तीर नज़रों के चलाना नहीं छोड़ा
ये शिक़वा सरकार, हज़ारों बार,
तुम्हीं से कर बैठे

सु:



मो
:
सु:
मो:

राहू दे ना खोट्या
तू आता ह्या कहाण्या
तुझ्यात आहे काय?
जा खोटारडे !
तुझ्यात आहे काय?
की व्हावे वेडे मीही
तरीही स्वप्नांमध्ये
तू येणे सोडीले
तीर नजरेचे चालविणे सोडीले
हुजूर ही तक्रार, हजारो वार,
तुझ्याकडं मी करतो

२०२३-०५-२९

गीतानुवाद-२७१: आ चल के तुझे

मूळ हिंदी गीतः किशोर कुमार, संगीतः किशोर कुमार, गायकः किशोर कुमार
चित्रपटः दूर गगन की छाव में, सालः १९६४, भूमिकाः किशोर कुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०५२९


धृ

आ चल के तुझे मैं ले के चलूं
इक ऐसे गगन के तले
जहाँ ग़म भी न हो आँसू भी न हो
बस प्यार ही प्यार पले

ये चल मी तुला घेऊन चलतो
एका ऐशा नभाच्या तळी
जिथे दुःख नसे, अश्रूही नसत
बस प्रेमच प्रेम असे

सूरज की पहली किरण से
आशा का सवेरा जागे
चंदा की किरण से धुल कर
घनघोर अंधेरा भागे
कभी धूप खिले कभी छाँव मिले
लम्बी सी डगर न खले

सूर्याची पहिली किरणे
आशेची पहाट करती
चंद्राच्या प्रकाशे धुवूनी
अंधार पुसूनी जाई
कधी ऊन पडे कधी छाया मिळे
लांबच वाटही न सले

जहाँ दूर नज़र दौड़ आए
आज़ाद गगन लहराए
जहाँ रंग बिरंगे पंछी
आशा का संदेसा लाएं
सपनो मे पली हँसती हो कली
जहाँ शाम सुहानी ढले

जिथवरती जाई नजरही
मोकळे गगन दिसताहे
जिथे रंगबिरंगी पक्षी
संकेत आशेचे देई
स्वप्नात आली हसतीशी कळी
जिथे सांज सुखाची सरे

सपनों के ऐसे जहां में
जहाँ प्यार ही प्यार खिला हो
हम जा के वहाँ खो जाएँ
शिकवा न कोई गिला हो
कहीं बैर न हो कोई गैर न हो
सब मिलके यूँ चलते चलें

स्वप्नील अशा संसारी
जिथे प्रेमच प्रेम फुले ते
तिथे जाऊन आम्हीही हरवू
तक्रार न कुठला सल हो
कुठे वैर न हो, कुणी गैर न हो
सोबत सगळेच चलू

२०२३-०५-२२

गीतानुवाद-२७०: ये रात भीगी भीगी

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर-जयकिसन, गायकः लता, मन्ना डे
चित्रपटः चोरी चोरी, सालः १९५४, भूमिकाः राज कपूर, नर्गीस 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०५२२


धृ

ये रात भीगी भीगी, ये मस्त फिजायें
तू चाल धीरे धीरे, वो चाँद प्यारा प्यारा
क्यों आग सी लगा के गुमसुम है चांदनी
सोने भी नहीं देता, मौसम का ये इशारा

ही रात्र सर्द ओली, बहारही मस्त ही
हळू चाल लाडक्या रे, चंद्रा खुशीखुशी
का आग लावूनीही, गुपचुप हे चांदणे
झोपूही न का देई, ऋतूचा खुला पुकारा

इठलाती हवा, नीलम सा गगन
कलियों पे ये बेहोशी की नमी
ऐसे में भी क्यों बेचैन है दिल
जीवन में न जाने क्या है कमी

अवखळ ही हवा, निळे हे गगन
कळ्यांवर धुंद जणू चढली
अशातही मन का अशांत असे
न जाणे जीवनी काय कमी  

जो दिन के उजाले में न मिला
दिल ढूंढें ऐसे सपने को
इस रात की जगमग में डूबी
मैं ढूंढ रही हूँ अपने को

जे स्वप्न न दिवसा उजेडी मिळे
ते स्वप्न हुडकते मन का रे
रात्रीच्या या चमचमाटामधे
शोधत मी आपले लोक असे

ऐसे में कहीं क्या कोई नहीं
भूले से जो हमको याद करे
एक हल्की सी मुस्कान से जो
सपनों का जहां आबाद करे

चुकूनही का न कुणी मजला
ऐशा अवस्थेत याद करे
एका अस्फुट स्मितानेही न का
स्वप्नांचे करे कुणी जग जागे