२०२३-०६-०३

गीतानुवाद-२७३: आ जा रे परदेसी

मूळ हिंदी गीतकारः शैलेंद्र, संगीतः सलील चौधरी, गायकः लता
चित्रपटः मधुमती, सालः १९५८, भूमिकाः दिलीपकुमार, वैजयंतीमाला, प्राण 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०८०५

धृ

आ जा रे ऽऽऽ परदेसी
मैं तो कब से खड़ी इस पार
ये अँखियाँ, थक गई पंथ निहार
आ जा रे ऽऽऽ परदेसी

ये रे ये जरी न देशी तू
मी तर कधीची उभी पार इथे
हे नेत्रही, थकले पाहुन वाट रे
ये रे ये जरी न देशी तू

तुम संग जनम जनम के फेरे
भूल गये क्यूँ साजन मेरे
तड़पत हूँ मैं सांझ सवेरे,
आ जा रे ऽऽऽ परदेसी

तुजसंग जन्म जन्मीचे फेरे
विसरलास का प्रियतम तू रे
झुरत असे मी रात्रंदिन रे,
ये रे ये जरी न देशी तू

मैं नदिया फिर भी मैं प्यासी
भेद ये गहरा बात ज़रा सी
बिन तेरे हर रात उदासी,
आ जा रे ऽऽऽ परदेसी

मी नदी असुनी तहानली रे
गूढ हे गहिरे गोष्ट सरळशी
तुजविण सजणा रात्र उदासी,
ये रे ये जरी न देशी तू

मैं दिये की ऐसी बाती
जल न सकी जो बुझ भी न पाती
आ मिल मेरे जीवन साथी,
आ जा रे ऽऽऽ परदेसी

मी दिव्याची वातच असली
उजळलीही ना, विझूही शकली
भेट मला तू, सोबत खरी रे,
ये रे ये जरी न देशी तू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.