मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः
शंकर-जयकिसन, गायकः लता, मन्ना डे
चित्रपटः चोरी चोरी, सालः १९५४,
भूमिकाः राज कपूर, नर्गीस
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०५२२
धृ
|
ये रात भीगी भीगी,
ये मस्त फिजायें तू चाल धीरे धीरे,
वो चाँद प्यारा प्यारा क्यों आग सी लगा के
गुमसुम है चांदनी सोने भी नहीं देता,
मौसम का ये इशारा
|
ही रात्र सर्द ओली, बहारही मस्त ही हळू चाल लाडक्या रे, चंद्रा खुशीखुशी का आग लावूनीही, गुपचुप हे चांदणे झोपूही न का देई, ऋतूचा खुला पुकारा
|
१
|
इठलाती हवा,
नीलम सा गगन कलियों पे ये बेहोशी की
नमी ऐसे में भी क्यों बेचैन
है दिल जीवन में न जाने क्या है
कमी
|
अवखळ ही हवा, निळे हे गगन कळ्यांवर धुंद जणू चढली अशातही मन का अशांत असे न जाणे जीवनी काय कमी
|
२
|
जो दिन के उजाले में न
मिला दिल ढूंढें ऐसे सपने को इस रात की जगमग में डूबी मैं ढूंढ रही हूँ अपने
को
|
जे स्वप्न न दिवसा उजेडी मिळे ते स्वप्न हुडकते मन का रे रात्रीच्या या चमचमाटामधे शोधत मी आपले लोक असे
|
३
|
ऐसे में कहीं क्या कोई
नहीं भूले से जो हमको याद करे एक हल्की सी मुस्कान से
जो सपनों का जहां आबाद करे
|
चुकूनही का न कुणी मजला ऐशा अवस्थेत याद करे एका अस्फुट स्मितानेही न का स्वप्नांचे करे कुणी जग जागे
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.