२०२३-०५-२९

गीतानुवाद-२७१: आ चल के तुझे

मूळ हिंदी गीतः किशोर कुमार, संगीतः किशोर कुमार, गायकः किशोर कुमार
चित्रपटः दूर गगन की छाव में, सालः १९६४, भूमिकाः किशोर कुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०५२९


धृ

आ चल के तुझे मैं ले के चलूं
इक ऐसे गगन के तले
जहाँ ग़म भी न हो आँसू भी न हो
बस प्यार ही प्यार पले

ये चल मी तुला घेऊन चलतो
एका ऐशा नभाच्या तळी
जिथे दुःख नसे, अश्रूही नसत
बस प्रेमच प्रेम असे

सूरज की पहली किरण से
आशा का सवेरा जागे
चंदा की किरण से धुल कर
घनघोर अंधेरा भागे
कभी धूप खिले कभी छाँव मिले
लम्बी सी डगर न खले

सूर्याची पहिली किरणे
आशेची पहाट करती
चंद्राच्या प्रकाशे धुवूनी
अंधार पुसूनी जाई
कधी ऊन पडे कधी छाया मिळे
लांबच वाटही न सले

जहाँ दूर नज़र दौड़ आए
आज़ाद गगन लहराए
जहाँ रंग बिरंगे पंछी
आशा का संदेसा लाएं
सपनो मे पली हँसती हो कली
जहाँ शाम सुहानी ढले

जिथवरती जाई नजरही
मोकळे गगन दिसताहे
जिथे रंगबिरंगी पक्षी
संकेत आशेचे देई
स्वप्नात आली हसतीशी कळी
जिथे सांज सुखाची सरे

सपनों के ऐसे जहां में
जहाँ प्यार ही प्यार खिला हो
हम जा के वहाँ खो जाएँ
शिकवा न कोई गिला हो
कहीं बैर न हो कोई गैर न हो
सब मिलके यूँ चलते चलें

स्वप्नील अशा संसारी
जिथे प्रेमच प्रेम फुले ते
तिथे जाऊन आम्हीही हरवू
तक्रार न कुठला सल हो
कुठे वैर न हो, कुणी गैर न हो
सोबत सगळेच चलू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.