२०२३-०७-०६

गीतानुवाद-२७५: दिल लगाकर हम ये समझे

मूळ हिंदी गीतः शकील बदायुनी, संगीतः सी. रामचंद्र, गायकः आशा भोसले
चित्रपटः जिंदगी और मौत, सालः १९६५, भूमिकाः प्रदीपकुमार, उमा दत्त, बेला बोस 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०७०५

धृ

दिल लगाकर हम ये समझे
ज़िंदगी क्या चीज़ है
इश्क़ कहते है किसे
और आशिक़ी क्या चीज़ है

जीव जडवून मी समजलो
काय हे जीवन असे
प्रेम म्हणती कशाला
प्रेम करणे काय असे

हाय ये रुखसार के शोले
ये बाहें मरमरी
आपसे मिलकर ये दो बातें
समझ मे आ गयी
धूप किसका नाम हैं और
चाँदनी क्या चीज़ हैं

हाय सौंदर्याचे निखारे
हे हातही कोमल किती
भेटून तुला दोन्हीही हे
नीट आकळले मला
ऊन संबोधन कशाचे
चांदणे हे काय असे

आपकी शोखी ने क्या क्या
रूप दिखलाए हमे
आपकी आँखो ने क्या क्या
जाम पिलवाए हमे
होश खो बैठे तो जाना
बेखुदी क्या चीज़ है

दाविली तव चपलतेने
रूपं कसकसली मला
नेत्रांनी तव पाजलेले
चषक कसकसले मला
हरपली ती शुद्ध तेव्हा
काय बेहोशी कळे

आपकी राहों में जबसे
हमने रखा है क़दम
हमको ये महसूस होता
है कि हैं मंज़िल पे हम
कोई क्या जाने मोहब्बत
की खुशी क्या चीज़ है

ठेवली मी पावले
जेव्हा तुझ्या वाटेवरी
अनुभवाला हेच आले
मजसी ईप्सित लाभले
ठाऊक कुणा होई कशाला
प्रेम किती आनंदमय

बाद मुद्दत के मिले तो
इस तरह देखा मुझे
जिस तरह एक अजनबीपर
अजनबी डाले नज़र
आपने ये भी न सोचा
दोस्ती क्या चीज़ है

भेटलो कालांतराने
तो पाहिले ऐसे मला
अनोळखी व्यक्तीस भेटे
जणू कुणी अज्ञातसा
विचार तू केलासही ना
मित्रता ही काय असे

पहले-पहले आप ही
अपना बना बैठे हमें
फिर न जाने किसलिए
दिल से भुला बैठे हमें
अब हुआ मालूम हमको
बेरुख़ी क्या चीज़ है

अगदी सुरवातीस तू
आपलेसे केलेसी मला
मग न जाणे का कळेना
विसरलासही तू मला
कळे आता मजसी की
तुटकता ती काय असे

प्यार सच्चा है मेरा तो
देख लेना ऐ सनम
आप आकर तोड़ देंगे
ख़ुद मेरी ज़ंजीर-ए-ग़म
बन्दा पर्वर जान लेंगे
बन्दगी क्या चीज़ है

प्रेम माझे जर खरे तर
पाहशील तूही प्रिया
तूच येऊन तोडशीलही
दुःखसाखळी तू स्वतः
मग मला समजेल हे की
बंधने ही काय असत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.