२०२३-०२-१२

गीतानुवाद-२६७: अपनी धुन में रहता हूँ

 


 

मूळ हिंदी गीतः नासिर काझमी

 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०२१२

 

धृ

अपनी धुन में रहता हूँ
मैं भी तेरे जैसा हूँ
ओ पिछली रुत के साथी
अब के बरस मैं तन्हा हूँ

तंद्रितच मी राहत रे
तुझ्यासमानच मीहि रे
मित्रा गेल्या ऋतुतील रे
एकटाच मी यंदा रे

तेरी गली में सारा दिन
दुख के कंकर चुनता हूँ
मुझ से आँख मिलाये कौन
मैं तेरा आईना हूँ

गल्लीतच तव सारा दिस
दुःखखडे मी वेचत रे 
दृष्टीस दृष्टि कोण करे
मी तर तव प्रतिबिंबच रे

मेरा दिया जलाये कौन
मैं तेरा ख़ाली कमरा हूँ
तू जीवन की भरी गली
मैं जंगल का रस्ता हूँ

उजळावा मम दीप कुणी
मी घर वेड्या तुझेच रे
गजबजगल्ली जीवनी तू
मी तर रस्ता जंगली रे

अपनी लहर है अपना रोग
दरिया हूँ और प्यासा हूँ
आती रुत मुझे रोयेगी
जाती रुत का झोंका हूँ

आपली मर्जी, आपला र्‍हास
तहानला मी समुद्र रे
येता ऋतू मजवर रडतो
गतऋतूचा मी झोका रे

२०२३-०१-०५

गीतानुवाद-२६६: दीवाना मस्ताना हुआ दिल

मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः आशा, रफ़ी
चित्रपटः बंबई का बाबू, सालः १९६०, भूमिकाः देव आनंद, कल्पना कार्तिक 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२१०३१


धृ

आआ आ आ..
प म ग म रे ग प म ग म
आआ आ ...
सा नी ध प म ग रे सा
नी नी नी ...
दीवाना, मस्ताना, हुआ दिल
जाने कहाँ होके बहार आई

आशा:

आआ आ आ..
प म ग म रे ग प म ग म
आआ आ ...
सा नी ध प म ग रे सा
नी नी नी ...
वेडेखुळे, खुळे, मन झाले
जाणे कुठुनशी बहार आली

तन को मेरे, छुए लट काली
छेड़े लहर, लहर मतवाली
बात कोई अन्जाना
दीवाना, मस्ताना, हुआ दिल
जाने कहाँ होके बहार आई

आशा:

स्पर्शे तनुस, तनुस लट काळी
वेधे लहर, लहर फिरणारी
गोष्ट अनोखी पहा ना
वेडेखुळे, खुळे, मन झाले
जाणे कुठुनशी बहार आली

ओ हो हो कुछ अनकही
कहे, मेरी चितवन
बोले जिया, लिखे मेरी धड़कन
एक नया अफसाना
ओ हो हो कुछ अनकही
कहे, मेरे चितवन
बोले जिया, लिखे मेरी धड़कन
एक नया अफ़साना

आशा:

नाही मुळी, मुळी बोललेली
बोले, माझी चाहूल
बोले मी अन्‌ लिहे माझे स्पंदन
किस्सा एक आगळासा
नाही मुळी, मुळी बोललेली
बोलते, माझी चाहूल
बोले मी अन्‌ लिहे माझे स्पंदन
किस्सा एक आगळासा

दीवाना, मस्ताना, हुआ दिल
जाने कहाँ होके बहार आई
ओ ओ ओओ
जाने कहाँ होके बहार आई
प म ग म रे ग प म ग म
आआ आ ...
सा नी ध प म ग रे सा
नी नी नी ...

रफ़ी:

वेडेखुळे, खुळे, मन झाले
जाणे कुठुनशी बहार आली
ओ ओ ओओ
जाणे कुठुनशी बहार आली
प म ग म रे ग प म ग म
आआ आ ...
सा नी ध प म ग रे सा
नी नी नी ...

ओ हो ओ सावन लगा
मचल गए बादल
देखूँ जिसे, हुआ वही पागल
सावन लगा, मचल गए बादल
देखूँ जिसे, हुआ वही पागल
कौन हुआ दीवाना ...
दीवाना, मस्ताना हुआ दिल
दीवाना मस्ताना हुआ दिल
जाने कहाँ होके बहार आई
आ आ आ ...
जाने कहाँ होके बहार आई
हो ओओ
जाने कहाँ होके बहार आई
आ आ आ
जाने कहाँ होके बहार आई

रफ़ी:

आशा:
फ़ी:
आशा:
रफ़ी:
आशा:
रफ़ी:
आशा:

रफ़ी:


आशा:

श्रावण आला
ढगच आले वाहत
पाहू ज्याला येई तोही खुळावत
श्रावण आला, ढगच आले वाहत
पाहू ज्याला झाला तोही पागल
कोण झाला यडापिसा ...
वेडेखुळे, खुळे, मन झाले
वेडेखुळे, खुळे, मन झाले
जाणे कुठुनशी बहार आली
आ आ आ ...
जाणे कुठुनशी बहार आली
हो ओओ
जाणे कुठुनशी बहार आली
आ आ आ ...
जाणे कुठुनशी बहार आली

२०२३-०१-०१

गीतानुवाद-२६५: मेरे देश की धरती

गीतकार: गुलशन बावरा,  संगीतकार: कल्याणजी आनंदजी,  गायक: महेंद्र कपूर
चित्रपट: उपकार, साल: १९६७, भूमिकाः मनोजकुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८०१२६ 

धृ

मेरे देश की धरती
सोना उगले
,  उगले हीरे मोती
मेरे देश की धरती
मेरे देश की धरती

माझी देश भूमी ही
सोने उगवे, उगवे हीरे, मोती
माझी देश भूमी ही
माझी देश भूमी ही

बैलों के गले में जब घुँगरू
जीवन का राग सुनाते हैं
गम कोस दूर हो जाता है
खुशियों के कंवल मुसकाते हैं
सुन के रहट की आवाज़े
यूँ लगे कही शहनाई बजे
आते ही मस्त बहारों के
दुल्हन की तरह हर खेत सजे

बैलांच्या गळ्यातील जव घुंगरू
जीवन गीतही ऐकवती
दुःख दूर सरे कोसावरती
कमळेही खुशीची फुलताती
ऐकून रहाटांचे रव ते
वाजे गमते कुठं शहनाई
येताच प्रसन्न बहारी ह्या
नवनवरीपरी हर शेत सजे

जब चलते हैं इस धरती पे हल
ममता अंगडाईयाँ लेती है
क्यो ना पूजे इस माटी को
जो जीवन का सुख देती है
इस धरती पे जिस ने जनम लिया
उसने ही पाया प्यार तेरा
यहा अपना पराया कोई नही
है सब पे माँ उपकार तेरा

चालती जेव्हा नांगर येथे
ममता जणु नाचत येत असे
या मातीला आम्ही का न पुजू
जी जीवन सुखमय हो करते
या धरतीवरी जन्मला जो असे
त्यालाच लाभले प्रेम तुझे
इथे आपला परका कोणी नसे
सर्वांवरी आई उपकार तुझे

ये बाग है गौतम नानक का
खिलते हैं अमन के फूल यहाँ
गाँधी सुभाष टैगोर तिलक
ऐसे हैं चमन के फूल यहाँ
रंग हरा हरीसिंग नलवे से
रंग लाल है लाल बहादूर से
रंग बना बसंती भगतसिंग
रंग अमन का वीर जवाहर से

ही बागच नानक गौतमची
फुलतात इथे शांतीची फुले
गांधी, सुभाष, टागोर टिळक
ही शांतिसुमनेच फुललित इथे
हिरवा हरीसिंग नलव्याचा
रंग लाल लाल बहादुरचा
भगवा भगतसिंगाचा रंग
शांतीचा रंग जवाहरचा

२०२२-१२-३०

गीतानुवाद-२६४: एक प्यार का नग्मा है

मूळ हिंदी गीतः संतोष आनंद, संगीतः लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायकः लता, मुकेश
चित्रपटः शोर, सालः १९७२, भूमिकाः मनोजकुमार, नंदा

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२१०३०


धृ

एक प्यार का नगमा है
मौजों की रवानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं
तेरी मेरी कहानी है

एक गाणे हे प्रेमाचे
धारांचे प्रवाह आहेत
जीवन आणि काही नाही
तुझीमाझी कहाणी आहे

कुछ पाकर खोना है
कुछ खोकर पाना है
जीवन का मतलब तो
आना और जाना है
दो पल के जीवन से
इक उम्र चुरानी है

काही मिळवून गमवायचे
काही गमवून मिळवायचे
जगण्याचा अर्थच तर
येणे आणि जाणे आहे
दो घडीच्या आयुष्यातून
एक वयच आहे चोरायचे

तू धार है नदिया की
मैं तेरा किनारा हूँ
तू मेरा सहारा है
मैं तेरा सहारा हूँ
आँखों में समंदर है
आशाओं का पानी है

तू धार नदीची आहेस
मी तीर तुझा सजणे
आधार तू माझा रे
अन्‌ आधार तुला मी रे
डोळ्यात समुद्र जणू
आशांचे हे पाणी आहे

तूफ़ान तो आना है
आकर चले जाना है
बादल है ये कुछ पल का
छा कर ढल जाना है
परछाईयाँ रह जाती
रह जाती निशानी है

वादळ येणारच आहे
येऊनच ते जाणार आहे
ढग हा आहे क्षणभरचा
बरसून पडून जाणार आहे
राहतील तरी छाया
राहतील खुणा तरीही

जो दिल को तस्सल्ली दे
वो साज़ उठा लाओ
दम घुट ने से पहले हि
आवाज़ उठा लाओ
खुशियों का तरन्नुम है
अस्को की जबानी है

समाधान मना जो दे
तो सूर उचलून घ्यावा
श्वास जाईल तोवरती
आवाज उचलून घ्यावा
खुशीची ही गाणी आहेत
अश्रुंच्या कहाणीतील

२०२२-१२-१९

गीतानुवाद-२६३: लागा चुनरी में दाग

मूळ हिंदी गीतः साहिर, संगीतः रोशन, गायकः मन्ना डे
चित्रपटः दिल ही तो है, सालः १९६३, भूमिकाः राज कपूर नूतन 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८०९

धृ

लागा चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग
चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे

पडला पदरी कलंक, लपवू कैसा
पडला पदरी कलंक
पडला कलंक, लपवू कैसी, घरी जाऊ कैसी

हो गई मैली मोरी चुनरिया
कोरे बदन सी कोरी चुनरिया
आ जाके बाबुल से, नज़रें मिलाऊँ कैसे
घर जाऊँ कैसे

पदर कलंकित झाला माझा
कोर्‍या तनुवत पदर तो कोरा
आ जाऊन वडिलांना देऊ नजर कैसी
घरी जाऊ कैसी

भूल गई सब बचन बिदा के
खो गई मैं ससुराल में आके
आ जाके बाबुल से, नज़रे मिलाऊँ कैसे
घर जाऊँ कैसे

वचने विसरले पाठवणीची
येऊन हरपले मी सासरासी
आ जाऊन वडिलांना देऊ नजर कैसी
घरी जाऊ कैसी

कोरी चुनरिया आत्मा मोरी
मैल है माया जाल
वो दुनिया मोरे बाबुल का घर
ये दुनिया ससुराल
हाँ जाके, बाबुल से, नज़रे मिलाऊँ कैसे
घर जाऊँ कैसे

कोरा पदर जणू आत्माच माझा
मळ जणू माया जाल
ती दुनिया माझ्या वडिलांचे घर
ही दुनिया सासुरवाड
आ जाऊन वडिलांना देऊ नजर कैसी
घरी जाऊ कैसी

आ आ~
धीम त न न न दिर दिर तानुम
ता न देरे न
धीम त न न न दिर दिर तान, धीम त देरे न
सप्त सुरन तीन ग्राम बंसी बाजी
दिर दिर तानी, ता नी नी द
नी द प म, प म म ग
म ध ग म म ग रे स
ध ध केटे ध ध ध केटे ध ध केट ध केट
धरत पाग पड़त नयी परण
झाँझर झनके झन नन झन नन
दिर दिर त तूम त द नी, त न न न त न न न
धीम त न न न न दिर दिर ताम

आ आ~
धीम त न न न दिर दिर तानुम
ता न देरे न
धीम त न न न दिर दिर तान, धीम त देरे न
सप्त सुरन तीन ग्राम बंसी बाजी
दिर दिर तानी, ता नी नी द
नी द प म, प म म ग
म ध ग म म ग रे स
ध ध केटे ध ध ध केटे ध ध केट ध केट
धरत पाग पड़त नयी परण
झाँझर झनके झन नन झन नन
दिर दिर त तूम त द नी, त न न न त न न न
धीम त न न न न दिर दिर ताम

गीतानुवाद-२६२: दुनियाँ करे सवाल तो हम क्या जबाब दे

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतकार: रोशन, गायक: लता मंगेशकर
चित्रपट: बहू बेगम, सालः १९६७, भूमिकाः मीनाकुमारी 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२१२१९

धृ

दुनियाँ करे सवाल, तो हम क्या जबाब दे
तुम कौन हो ख़याल, तो हम क्या जबाब दे

विचारेल जग मला, तर मी काय उत्तरू
तू कोण ह्या विचारास, मी काय उत्तरू

पूछे कोई के दिल को कहाँ छोड़ आये हो
किस किस से अपना रिश्ता-ए-जान जोड़ आये हैं
मुश्किल हो अर्ज-ए-हाल तो, हम क्या जबाब दे

विचारेल कोणी चित्त कुठे सोडलेस तू
आपला कुणाकुणाशी जीव जडवलास तू
सांगणे असेल कठीण, तर मी काय उत्तरू

पूछे कोई दर्द-ए-वफ़ा कौन दे गया
रातों को जागने की सजा कौन दे गया
कहने पे हो मलाल, तो हम क्या जबाब दे

विचारेल प्रीतीदुःख कुणी तुज दिले असे
रात्रीस जागण्याची सजा कुणी दिली असे
बोलून होय दुःख, तर मी काय उत्तरू