२०२३-०१-०१

गीतानुवाद-२६५: मेरे देश की धरती

गीतकार: गुलशन बावरा,  संगीतकार: कल्याणजी आनंदजी,  गायक: महेंद्र कपूर
चित्रपट: उपकार, साल: १९६७, भूमिकाः मनोजकुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८०१२६ 

धृ

मेरे देश की धरती
सोना उगले
,  उगले हीरे मोती
मेरे देश की धरती
मेरे देश की धरती

माझी देश भूमी ही
सोने उगवे, उगवे हीरे, मोती
माझी देश भूमी ही
माझी देश भूमी ही

बैलों के गले में जब घुँगरू
जीवन का राग सुनाते हैं
गम कोस दूर हो जाता है
खुशियों के कंवल मुसकाते हैं
सुन के रहट की आवाज़े
यूँ लगे कही शहनाई बजे
आते ही मस्त बहारों के
दुल्हन की तरह हर खेत सजे

बैलांच्या गळ्यातील जव घुंगरू
जीवन गीतही ऐकवती
दुःख दूर सरे कोसावरती
कमळेही खुशीची फुलताती
ऐकून रहाटांचे रव ते
वाजे गमते कुठं शहनाई
येताच प्रसन्न बहारी ह्या
नवनवरीपरी हर शेत सजे

जब चलते हैं इस धरती पे हल
ममता अंगडाईयाँ लेती है
क्यो ना पूजे इस माटी को
जो जीवन का सुख देती है
इस धरती पे जिस ने जनम लिया
उसने ही पाया प्यार तेरा
यहा अपना पराया कोई नही
है सब पे माँ उपकार तेरा

चालती जेव्हा नांगर येथे
ममता जणु नाचत येत असे
या मातीला आम्ही का न पुजू
जी जीवन सुखमय हो करते
या धरतीवरी जन्मला जो असे
त्यालाच लाभले प्रेम तुझे
इथे आपला परका कोणी नसे
सर्वांवरी आई उपकार तुझे

ये बाग है गौतम नानक का
खिलते हैं अमन के फूल यहाँ
गाँधी सुभाष टैगोर तिलक
ऐसे हैं चमन के फूल यहाँ
रंग हरा हरीसिंग नलवे से
रंग लाल है लाल बहादूर से
रंग बना बसंती भगतसिंग
रंग अमन का वीर जवाहर से

ही बागच नानक गौतमची
फुलतात इथे शांतीची फुले
गांधी, सुभाष, टागोर टिळक
ही शांतिसुमनेच फुललित इथे
हिरवा हरीसिंग नलव्याचा
रंग लाल लाल बहादुरचा
भगवा भगतसिंगाचा रंग
शांतीचा रंग जवाहरचा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.