मूळ हिंदी गीतः नासिर काझमी
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०२१२
धृ
|
अपनी
धुन में रहता हूँ मैं
भी तेरे जैसा हूँ ओ
पिछली रुत के साथी अब
के बरस मैं तन्हा हूँ
|
तंद्रितच मी राहत रे तुझ्यासमानच मीहि रे मित्रा गेल्या ऋतुतील रे एकटाच मी यंदा रे
|
१
|
तेरी
गली में सारा दिन दुख
के कंकर चुनता हूँ मुझ
से आँख मिलाये कौन मैं
तेरा आईना हूँ
|
गल्लीतच तव सारा दिस दुःखखडे मी वेचत रे दृष्टीस दृष्टि कोण करे मी तर तव प्रतिबिंबच रे
|
२
|
मेरा
दिया जलाये कौन मैं
तेरा ख़ाली कमरा हूँ तू
जीवन की भरी गली मैं
जंगल का रस्ता हूँ
|
उजळावा मम दीप कुणी मी घर वेड्या तुझेच रे गजबजगल्ली जीवनी तू मी तर रस्ता जंगली रे
|
३
|
अपनी
लहर है अपना रोग दरिया
हूँ और प्यासा हूँ आती
रुत मुझे रोयेगी जाती
रुत का झोंका हूँ
|
आपली मर्जी, आपला र्हास तहानला मी समुद्र रे येता ऋतू मजवर रडतो गतऋतूचा मी झोका रे
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.