२०१६-०८-११

गीतानुवाद-०८५: आपके हसीन रुखपे

मूळ हिंदी गीतः शिवेन रिज़वी, अज़ीज़, संगीतकार: ओ.पी.नय्यर, गायकः महंमद रफी
चित्रपटः बहारें फिर भी आयेंगी, सालः १९६६, भूमिकाः धर्मेंद्र, तनुजा, माला सिन्हा

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०८०८


धृ

आप के हसीन रुख पे आज नया नूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा कसूर है
आप की निगाह ने कहा तो कुछ जरूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है

ग तुझ्या सौंदर्यावरती आज नवे तेज आहे
हरखले माझे मन जरा तर माझी काय चूक आहे
काहीसे डोळ्यांनी तुझ्या सांगितले खास आहे
हरखले माझे मन जरा तर माझी काय चूक आहे

१

खुली लटों की छाव में खिला खिला ये रूप है
घटा से जैसे छन रही सुबह सुबह की धुप है
जिधर नज़र मुड़ी उधर सुरूर ही सुरूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है

खुल्या बटांच्या सावलीत खुललेलं तुझं रूप आहे
रात्रीशी जणू झटत इथे सकाळचे हे ऊन आहे
जिथे नजर वळेल तिथे प्रसन्नता जरूर आहे
हरखले माझे मन जरा तर माझी काय चूक आहे

२

झुकी झुकी निगाह में भी है बला की शोखियाँ
दबी दबी हसीं में भी तड़प रही है बिजलियाँ
शबाब आपका नशे में खुद ही चूर चूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है

झुकत जरी नजर, तिच्यात रम्य वीज आहे
निसटत्या हासण्यातही तडित-तडफ खरीच आहे
यौवन तुझे स्वतःच धुंद, चूर धुंदीतहि आहे
हरखले माझे मन जरा तर माझी काय चूक आहे

३

जहा जहा पड़े कदम वह फिजां बदल गयी
के जैसे सर बसर बहार आप ही में ढल गयी
किसी में ये कशिश कहा जो आप में हुज़ूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है

पाऊल पडे तुझे तिथे बदलले गं ऋतू आहेत
जणू बहार नखशिखांत, तुझ्या मुशीत सिद्ध आहे
कुणात ओढ ही कशी, असेल जी तुझ्यात आहे
हरखले माझे मन जरा तर माझी काय चूक आहे


https://www.youtube.com/watch?v=GQblX
2TmEZI

२०१६-०७-३१

गीतानुवाद-०८४: तुम्हारी नज़र

मूळ हिंदी गीतकार: साहिर लुधियानवी, संगीतः रवी, गयक: रफी, लता
चित्रपटः दो कलियाँ, सालः १९६८, भूमिकाः विश्वजीत, माला सिन्हा, नितू सिंग
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७१०१०
॥
धृ
॥
रफी
तुम्हारी नज़र क्यों खफ़ा हो गई?
खता बख्श दो गर खता हो गई
लता
हमारा इरादा तो कुछ भी न था
तुम्हारी खता खुद सज़ा हो गई
रफी
कशाला नजर वद तुझी कोपली? 
क्षमा कर मला जर चुकी जाहली
लता
न माझ्या मनी हेतू कुठलाही होता
कुरापत तुझीच तुज सज़ा जाहली

॥
१
॥
रफी
सज़ा ही सही आज कुछ तो मिला है
सज़ा में भी इक प्यार का सिलसिला है
मोहब्बत का कुछ भी अन्जाम हो
मुलाक़ात ही इल्तजा हो गई
रफी
सज़ा तर सजा, ती मला लाभली
सजेतही कथा प्रीतीची व्यक्त झाली
परिणाम जो व्हायचा तोच होवो
सुरूवात ह्या हितगुजानेच झाली

॥
२
॥

लता
मुलाक़ात पे इतने मगरूर क्यों हो
हमारी खुशामद पे मजबूर क्यों हो
मनाने की आदत कहां पड़ गई
खताओं की तालीम क्या हो गई

लता
कशाला हवी ऐट ही बोलण्याची
निकड का तुला भासली आर्जवांची
सवय लागली ही कधी आर्जवांची
कुठे शिकवणी गेली भंडावण्याची

॥
३
॥

रफी
सताते न हम तो मनाते ही कैसे
तुम्हें अपने नज़दीक लाते ही कैसे
किसी दिन की चाहत अमानत ये थी
वो आज दिल की आवाज़ हो गई

रफी
सतावता न जर तर कसा विनवता मी जवळिक तुझ्याशी कसा साधता मी
मनीषा मनी ह्या दिसाचीच होती मनोप्रार्थना साधली आजला ती

॥
४
॥

लता
सजा कुछ भी दो पर, खता तो बता दो
मेरी बेगुनाही का, कुछ तो सिला दो
मेरे दिल के मालिक, मेरे देवता
बस अब जुल्म की, इम्तिहाँ, हो गई

लता
सजा दे, परी अपराध सांग माझा
निष्पाप मी, ते मला श्रेय दे ना
मनोस्वामी तू, तू माझी देवता
पुरे क्लेश हे, सोसती हे न आता




२०१६-०७-०७

गीतानुवाद-०८३: चेहरे पे ख़ुशी छा जाती है

                        
मूळ हिंदी गीतः साहीर लुधियानवी, संगीतः रवी, गायीकाः आशा
चित्रपटः वक्त, सालः १९६५, भूमिकाः सुनीलदत्त, साधना

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६१०१४

॥
धृ
॥
चेहरे पे ख़ुशी छा जाती है
आँखों में सुरूर आ जाता है
जब तुम मुझे अपना कहते हो
अपने पे ग़ुरूर आ जाता है
चेहर्‍याची कळी खुलते पटकन
नेत्रांत लकाकीही येते
जेव्हा तू मला आपली म्हणसी
स्वतःचेच कौतुक वाटते

॥
१
॥
तुम हुस्न की ख़ुद एक दुनिया
हो शायद ये तुम्हें मालूम नहीं
महफ़िल में तुम्हारे आने से हर
चीज़ पे नूर आ जाता है
सौंदर्याची दुनिया तू पुरी
हे बहुधा तुला माहीत नसे
सोहळ्यात, तुझ्या आगमनाने
हर वस्तू जणू तेजे भरते

॥
२
॥
हम पास से तुमको क्या देखें
तुम जब भी मुक़ाबिल आते हो
बेताब निगाहों के आगे परदा
सा ज़रूर आ जाता है
मी पाहू कसे जवळून तुजला
येशी तू समोर जेव्हा केव्हा
होऊन अधीर, नयनांपुढती
पडदासाच येतो मात्र खरे

॥
३
॥
जब तुमसे मुहब्बत की हमने
तब जा के कहीं ये राज़ खुला
मरने का सलीका आते ही
जीने का शऊर आ जाता है
केली मी प्रीत तुझ्यावरती
तेव्हाच हे रहस्य उलगडले
मरण्याच्या रीती कळून येता
जगण्याचे रहस्यही आकळते


२०१६-०६-०७

गीतानुवाद-०८२: देखती ही रहो

मूळ हिंदी गीत: नीरज, संगीत: रोशन, गायक: मुकेश
चित्रपट: नयी उम्र की नयी फसल, सालः १९६६, भूमिकाः तनुजा, राजीव

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००४१०१८



२०१६-०५-२४

गीतानुवाद-०८१: चाहूँगा मैं तुझे साँझ सवेरे

मूळ हिंदी गीतकार: मजरुह सुलतानपुरी, संगीतकार: लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक: मोहम्मद रफी
चित्रपट: दोस्ती, साल: १९६४, भूमिका: सुधीरकुमार, सुशीलकुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०५२४

॥
धृ
॥
चाहूँगा मैं तुझे साँझ सवेरे
फिर भी कभी अब नाम को तेरे
आवाज़ मैं ना दूँगा,
आवाज़ मैं ना दूँगा

चाहेन मी तुज संध्या-सकाळी
तरीही आता कधी नावाने तुझ्या
बोलावणार नाही
बोलावणार नाही
॥
१
॥
देख मुझे सब है पता
सुनता है तू मन की सदा
मितवा, मेरे यार, तुझ को बार बार
आवाज़ मैं ना दूँगा

जाण मला सर्व आहे ज्ञात
ऐकशी तू मनची ही साद
मित्रा, दोस्ता, मी तुला वारंवार
बोलावणार नाही
॥
२
॥
दर्द भी तू, चैन भी तू
दरस भी तू, नैन भी तू
मितवा, मेरे यार, तुझ को बार बार
आवाज़ मैं ना दूँगा

दुःखही तू, सौख्यही तू
दर्शन तू, नयनही तू
मित्रा, दोस्ता, मी तुला वारंवार
बोलावणार नाही

           



२०१६-०५-२१

गीतानुवाद-०८०: चाँद आहे भरेगा

मूळ हिंदी गीतः आनंदबक्षी, संगीतः कल्याणजी-आनंदजी, गायक: मुकेश
चित्रपटः फुल बने अंगारे, साल: १९६३, भूमिकाः मालासिन्हा, राजकुमार
                                                                       
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६१०१५

॥
धृ
॥
चाँद आहे भरेगा
फुल दिल थाम लेंगे
हुस्न की बात चली तो
सब तेरा नाम लेंगे
चंद्र निश्वास सोडिल
श्वास फुलं रोखतील
विषय सौंदर्य येता
सर्व तव नाव घेतील

॥
१
॥
ऐसा चेहरा है तेरा
जैसे रोशन सवेरा
जिस जगह तू नही हैं
उस जगह है अंधेरा
कैसे फिर चैन तुझबिन
तेरे बदनाम लेंगे
हुस्न की बात चली तो
सब तेरा नाम लेंगे
आहे चेहरा असा तव
उजळे दिन दीप्ती घेऊन
ज्या स्थळी तू न असशी
त्या स्थळी ये अंधारून
कैसे मग शांत तुजविण
तुझे बदनाम होतील
विषय सौंदर्य येता
सर्व तव नाव घेतील

॥
२
॥
आँखे नाजुकसी कलियाँ
बाते मिसरी डलियाँ
होठ गंगा के साहिल
जुल्फे जन्नत की गलियाँ
तेरे खातिर फरिश्ते
सर पे इल्जाम लेंगे
हुस्न की बात चली तो
सब तेरा नाम लेंगे
नेत्र नाजुक कळ्या त्या
बोल खडीसाखरी ते
ओठ गंगाकिनारे
केस स्वर्गीय वाटा
तुझ्याखातर देवदूत
शिरी आरोप घेतील
विषय सौंदर्य येता
सर्व तव नाव घेतील