२०१६-०५-२४

गीतानुवाद-०८१: चाहूँगा मैं तुझे साँझ सवेरे

मूळ हिंदी गीतकार: मजरुह सुलतानपुरी, संगीतकार: लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक: मोहम्मद रफी
चित्रपट: दोस्ती, साल: १९६४, भूमिका: सुधीरकुमार, सुशीलकुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०५२४

धृ
चाहूँगा मैं तुझे साँझ सवेरे
फिर भी कभी अब नाम को तेरे
आवाज़ मैं ना दूँगा,
आवाज़ मैं ना दूँगा

चाहेन मी तुज संध्या-सकाळी
तरीही आता कधी नावाने तुझ्या
बोलावणार नाही
बोलावणार नाही

देख मुझे सब है पता
सुनता है तू मन की सदा
मितवा, मेरे यार, तुझ को बार बार
आवाज़ मैं ना दूँगा

जाण मला सर्व आहे ज्ञात
ऐकशी तू मनची ही साद
मित्रा, दोस्ता, मी तुला वारंवार
बोलावणार नाही
दर्द भी तू, चैन भी तू
दरस भी तू, नैन भी तू
मितवा, मेरे यार, तुझ को बार बार
आवाज़ मैं ना दूँगा

दुःखही तू, सौख्यही तू
दर्शन तू, नयनही तू
मित्रा, दोस्ता, मी तुला वारंवार
बोलावणार नाही

           



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.