२०१६-०५-२१

गीतानुवाद-०८०: चाँद आहे भरेगा

मूळ हिंदी गीतः आनंदबक्षी, संगीतः कल्याणजी-आनंदजी, गायक: मुकेश
चित्रपटः फुल बने अंगारे, साल: १९६३, भूमिकाः मालासिन्हा, राजकुमार
                                                                       
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६१०१५

धृ
चाँद आहे भरेगा
फुल दिल थाम लेंगे
हुस्न की बात चली तो
सब तेरा नाम लेंगे
चंद्र निश्वास सोडिल
श्वास फुलं रोखतील
विषय सौंदर्य येता
सर्व तव नाव घेतील

ऐसा चेहरा है तेरा
जैसे रोशन सवेरा
जिस जगह तू नही हैं
उस जगह है अंधेरा
कैसे फिर चैन तुझबिन
तेरे बदनाम लेंगे
हुस्न की बात चली तो
सब तेरा नाम लेंगे
आहे चेहरा असा तव
उजळे दिन दीप्ती घेऊन
ज्या स्थळी तू न असशी
त्या स्थळी ये अंधारून
कैसे मग शांत तुजविण
तुझे बदनाम होतील
विषय सौंदर्य येता
सर्व तव नाव घेतील

आँखे नाजुकसी कलियाँ
बाते मिसरी डलियाँ
होठ गंगा के साहिल
जुल्फे जन्नत की गलियाँ
तेरे खातिर फरिश्ते
सर पे इल्जाम लेंगे
हुस्न की बात चली तो
सब तेरा नाम लेंगे
नेत्र नाजुक कळ्या त्या
बोल खडीसाखरी ते
ओठ गंगाकिनारे
केस स्वर्गीय वाटा
तुझ्याखातर देवदूत
शिरी आरोप घेतील
विषय सौंदर्य येता
सर्व तव नाव घेतील


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.