२०१५-०५-१९

गीतानुवाद-०३८: दिल का भँवर करे पुकार

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः मोहंमद रफी
चित्रपटः तेरे घर के सामने, सालः १९६३, भूमिकाः देव आनंद, नूतन

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००४१११५


धृ
दिल का भँवर करे पुकार
प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो
प्यार का राग सुनो रे
मन चा मयुर करे पुकार
प्रेम आलाप श्रवा, प्रेम आलाप श्रवा
प्रेम आलाप श्रवा रे

फुल तुम गुलाब का
क्या जवाब आपका
जो अदा है वो बहार है
आज दिल की बेकली
गयी जुबान पर
बात ये है तुम से प्यार है
दिल तुम्ही को दिया रे
फुल तू गुलाबाचे
काय तुलना तुज असे
जी लकब तुझी बहारीची
अंतरीचे गूज ते
ओठांवरती आलेले
गोष्ट, तुजवरी प्रेम असे
हृदय तुज मी दिले गं

चाहे तुम मिटाना
पर ना तुम गिराना
आँसु की तरह निगाह से
प्यार की उँचाई
इष्क की गहराई
पुँछ लो हमारी आह से
आसमाँ छु लिया रे
वाटल्यास नष्ट कर
पण तू दवड मला
अश्रुंच्या परीच ओघळून
उंची प्रेमभावाची
खोली अनुरागाची
पूस निश्वासास माझ्या गं
आकाशा हात पोचे

इस हसीन तार पे
हम ना बैठे हार के
साया बन के साथ हम चले
आज मेरे संग तू
गुँजे दिल की आरजू
तुझ से मेरी आँख जब मिले
जाने क्या कर दिया रे
या समयी बहारीच्या
हतोत्साह आम्ही नसू
सावली बनून चाललो
आज माझे संग तू
मनीषा लागे मोहरू
तुझसी नजरभेट होत गं
काय हे केले तू गं



२०१५-०५-१८

गीतानुवाद-०३७: ये कौन चित्रकार है



मूळ हिंदी गीतकार: भरत व्यास, संगीत: सतीश भाटिया, गायक: मुकेश
चित्रपट: बुंद जो बन गई मोती, १९६७, भूमिका: जितेंद्र, मुमताझ

मराठी अनुवादः २००६१२१६

धृ
ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार

हा कोण चित्रकार आहे हा कोण चित्रकार आहे
हरी भरी वसुंधरा पर नीला नीला ये गगन
के जिसपे बादलों की पालकी उड़ा रहा पवन
दिशाएँ देखो रंग भरी,
दिशाएँ देखो रंग भरी चमक रहीं उमंग भरी
ये किसने फूल फूल पे
ये किसने फूल फूल पे किया सिंगार है
हिरव्या कंच धरतीवरती, निळे निळे हे गगन
ज्याचेवरती पालखी ढगांची, उडवितसे हा पवन
दिशा पाहा ह्या रंगल्या
दिशा पाहा ह्या रंगल्या, उमेदीने झळाळल्या
ह्या कोणी फुलांफुलांवरती
ह्या कोणी फुलांफुलांवरती, चढविला हा साज

तपस्वियों सी हैं अटल ये पर्वतों की चोटियाँ
ये बर्फ़ कि घुमेरदार घेरदार घाटियाँ
ध्वजा से ये खड़े हुए,
ध्वजा से ये खड़े हुए, हैं वृक्ष देवदार के
गलीचे ये गुलाब के, बगीचे ये बहार के
ये किस कवि की कल्पना
ये किस कवि की कल्पना का चमत्कार है
शिखरे ही पर्वतांची तपस्व्यांपरी उभी अचल,
वळणदार, वाकदार हिमगिरीचे घाट
ध्वजापरी उभे पाहा, 
ध्वजापरी उभे पाहा, हे वृक्ष देवदारचे
हे गालिचे गुलाबाचे, हे ताटवे बहारीचे
कुठल्या कवीच्या कल्पनेचा
कुठल्या कवीच्या कल्पनेचा, चमत्कार हा

कुदरत की इस पवित्रता को तुम निहार लो
इनके गुणों को अपने मन में तुम उतार लो
चमका लो आज लालिमा,
चमका लो आज लालिमा अपने ललाट की
कण कण से झाँकती तुम्हे, छबी विराट की
अपनी तो आँख एक है
अपनी तो आँख एक है
उसकी हज़ार है
निसर्गाच्या पवित्रतेस अवलोक तू जरा
त्याच्या गुणांना अंतरात थार दे जरा
लालिमा उजळून घे, 
लालिमा उजळून घे, आपल्या ललाटीचा
कणाकणानी बघतसे,  तुज विश्व  हे विराट
आपणास दृष्टी एकची
आपणास दृष्टी एकची, त्याला हजार आहेत




२०१५-०५-१७

गीतानुवाद-०३६: दिन हैं बहार के

मूळ हिंदी गीतः साहिर, संगीतः रवी, गायकः लता, रफी
चित्रपटः वक्त, सालः १९६५, भूमिकाः बलराज, सुनील दत्त

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०६११


धृ
लताः
दिन हैं बहार के, तेरे मेरे इकरार के
दिल के सहारे आजा प्यार करे
रफीः
दुष्मन हैं प्यार के जब लाखो गम संसार के
दिल के सहारे कैसे प्यार करें
लताः
दिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे
ऊत्स्फूर्ततेने, ये तू, प्रेम करू
रफीः
दुःखं लाख संसारी ह्या, शत्रू जणु की प्रेमाचे
ऊत्स्फूर्ततेने, प्रेम करावे कसे

लताः
दुनिया का बोझ जरा, दिल से उतार दे छोटीसी जिंदगी है, हस के गुजार दे
रफीः
अपनी तो जिंदगी, जीति है जी को मार के
दिल के सहारे कैसे प्यार करे
लताः
दुनियेचं ओझं तू, उतरव पाहू मनावरून
छोटेसे आयुष्य आहे, जगून घे, हसून तू
रफीः
आपले तर जीवनच, जगते मनाला मारुनच
ऊत्स्फूर्ततेने, प्रेम करावे कसे

रफीः
अच्छा नहीं होता, युंही सपनों से खेलना
बडा ही कठीन है, हकिकतों को झेलना
लताः
अपनी हकिकते, मेरे सपनों पे वार के
दिल के सहारे आजा प्यार करे
रफीः
बरे नसते मुळी, स्वप्नांशी असे खेळणे
फारच अवघड असे, बघ वास्तवास झेलणे
लताः
वास्तवास ह्या तुझ्या, माझ्या स्वप्नांवर ओवाळून
ऊत्स्फूर्ततेने, ये तू, प्रेम करू

लताः
ऐसी वैसी बातें सभी, दिल से निकाल दे
जीना है तो कश्ती को, धार पें डाल दे
रफीः
धारे की गोद में, घेरे भी हैं, मंजधार के
दिल के सहारे कैसे प्यार करे
लताः
विचार तू भलते सलते, काढून टाक मनामधून
जगायचे तर, नावेला, भर प्रवाहात लाव तू
रफीः
भर प्रवाहात असती, जप तू, गोते कमालीचे
ऊत्स्फूर्ततेने, प्रेम करावे कसे




२०१५-०५-१६

गीतानुवाद-०३५: जूही की कली मेरी लाडली

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायकः सुमन कल्याणपूर
चित्रपटः दिल एक मंदिर, सालः १९६३, भूमिकाः राजेंद्रकुमार, मीना कुमारी, राजकुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८२२

धृ
जूही की कली मेरी लाडली
नाज़ों की पली मेरी लाडली
ओ आस-किरन जुग-जुग तू जीए
नन्ही सी परी मेरी लाडली
ओ मेरी लाडली
जूईची कळी माझी लाडकी
लाडात वाढली माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी

धरती पे उतर आया चँदा तेरा चहरा बना
चम्पी का सलौना गुलदस्ता तन तेरा बना
ओ मेरी लाडली
कोमल तितली मेरी लाडली
हीरे की कनी मेरी लाडली
ओ आस-किरन जुग-जुग तू जीए
नन्ही सी परी मेरी लाडली
ओ मेरी लाडली
धरतीवर उतरला चंद्र, तुझा चेहरा झाला
चाफ्याच्या फुलांचा गुच्छ तुझा मोहरा झाला
ओ माझी लाडकी
फुलपाखरू माझी लाडकी
हिरकणी शोभे माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग ए
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी

शर्माए दीवाली तारों की तेरे नैनों से
कोयल ने चुराई है पंचम तेरे बैनों से
ओ मेरी लाडली
गुड़िया सी ढली मेरी लाडली
मोहे लागे भली मेरी लाडली
ओ आस-किरन जुग-जुग तू जीए
नन्ही सी परी मेरी लाडली
ओ मेरी लाडली
लाजे दिवाळी तार्‍यांची तुझे डोळे बघून
घेतला कोकिळेने पंचम तव आलापांतून
ओ माझी लाडकी
बाहुलीपरी घडली माझी लाडकी
मला वाटे भली माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी

हर बोल तेरा सिखलाए हमें दुख से लड़ना
मुस्कान तेरी कहती है सदा धीरज धरना
ओ मेरी लाडली
गंगा की लहर मेरी लाडली
चंचल सागर मेरी लाडली
ओ आस-किरन जुग-जुग तू जीए
नन्ही सी परी मेरी लाडली
ओ मेरी लाडली
हर बोल तुझा दुःखाशी लढा आम्हा सांगे
तुझे हास्य जरासा धीर धरा आम्हा सांगे
ओ माझी लाडकी
गंगेची लहर माझी लाडकी
चंचल सागर माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग ए
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी


२०१५-०५-१४

गीतानुवाद-०३३: ओ पवन वेग से उड़ने वाले घोड़े

मूळ हिंदी गीतकारः भरत व्यास, संगीतः एस. एन. त्रिपाठी, गायकः लता
चित्रपटः जय चितौड, सालः १९६१, भूमिकाः जयराज, निरुपा रॉय

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००९०७२३


धृ
ओ पवन वेग से उड़ने वाले घोड़े
तुझ पे सवार है जो, मेरा सुहाग है वो
रखियो रे आज उनकी लाज हो
ए वायू वेगे उडणार्‍या तू अश्वा
तुजवरती स्वार आज, माझे सौभाग्य आहे
राख रे आज त्याची लाज रे





तेरे कंधों पर आज भार है मेवाड़ का
करना पड़ेगा तुझको सामना पहाड़ का
हल्दी घाटी नहीं है काम कोई खिलवाड़ का
देना जवाब वहाँ शेरों की दहाड़ का
घड़ियां तूफ़ान की हैं
तेरे इम्तहान की हैं
रखियो रे आज उनकी लाज हो, ओ पवन
तुझ्या खांद्यांवर भार, आज आहे मेवाडचा
चढावा लागेल पर्वताचा मार्ग रे तुला
लुटुपुटीचा मुळीच ना, खेळ हळदीघाटीचा
करी सामना तिथे तू, वाघाच्या डरकाळीचा
वेळ वादळाची आहे
तुझ्या परीक्षेची आहे
राख रे आज त्याची लाज रे





छक्के छुड़ाना देना तू दुश्मनों की चाल के
उनकी छाती पे चढ़ना पाँव तू उछाल के
लाना सुहाग मेरा वापस तू सम्भाल के
तेरे इतिहास में अक्षर होंगे गुलाल के
चेतक महान है तू
बिजली की बान है तू
रखियो रे आज उनकी लाज हो, ओ पवन
शत्रूच्या व्यूहास उधळून लाव, कर कमाल तू
त्यांच्या छातीवर रोव पाय, उचलून टाच तू
माझे सौभाग्य परतून आण, सांभाळून तू
तुझा इतिहास लिहीतील, लाल अक्षरे जाण तू
चेतक महान रे तू
विजेचाच वाण रे तू
राख रे आज त्याची लाज रे