मूळ हिंदी गीतकारः भरत व्यास, संगीतः एस. एन. त्रिपाठी,
गायकः लता
चित्रपटः जय चितौड, सालः १९६१, भूमिकाः जयराज, निरुपा रॉय
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००९०७२३
॥ धृ ॥ |
ओ पवन वेग से उड़ने वाले घोड़े
तुझ पे सवार है जो, मेरा सुहाग है वो रखियो रे आज उनकी लाज हो |
ए वायू वेगे उडणार्या तू अश्वा तुजवरती स्वार आज, माझे सौभाग्य आहे राख रे आज त्याची लाज रे |
॥ १ ॥ |
तेरे कंधों पर आज भार है मेवाड़ का
करना पड़ेगा तुझको सामना पहाड़ का हल्दी घाटी नहीं है काम कोई खिलवाड़ का देना जवाब वहाँ शेरों की दहाड़ का घड़ियां तूफ़ान की हैं तेरे इम्तहान की हैं रखियो रे आज उनकी लाज हो, ओ पवन |
तुझ्या खांद्यांवर भार, आज आहे मेवाडचा चढावा लागेल पर्वताचा मार्ग रे तुला लुटुपुटीचा मुळीच ना, खेळ हळदीघाटीचा करी सामना तिथे तू, वाघाच्या डरकाळीचा वेळ वादळाची आहे तुझ्या परीक्षेची आहे राख रे आज त्याची लाज रे |
॥ २ ॥ |
छक्के छुड़ाना देना तू दुश्मनों की चाल के
उनकी छाती पे चढ़ना पाँव तू उछाल के लाना सुहाग मेरा वापस तू सम्भाल के तेरे इतिहास में अक्षर होंगे गुलाल के चेतक महान है तू बिजली की बान है तू रखियो रे आज उनकी लाज हो, ओ पवन |
शत्रूच्या व्यूहास उधळून लाव, कर कमाल तू त्यांच्या छातीवर रोव पाय, उचलून टाच तू माझे सौभाग्य परतून आण, सांभाळून तू तुझा इतिहास लिहीतील, लाल अक्षरे जाण तू चेतक महान रे तू विजेचाच वाण रे तू राख रे आज त्याची लाज रे |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.