मूळ हिंदी गीतकार: भरत व्यास,
संगीत: सतीश भाटिया, गायक: मुकेश
चित्रपट: बुंद जो बन गई मोती, १९६७, भूमिका: जितेंद्र, मुमताझ
मराठी अनुवादः २००६१२१६
धृ
|
ये कौन
चित्रकार है ये कौन चित्रकार
|
हा कोण चित्रकार आहे हा कोण चित्रकार आहे
|
॥
१
॥
|
हरी भरी
वसुंधरा पर नीला नीला ये गगन
के जिसपे
बादलों की पालकी उड़ा रहा पवन
दिशाएँ देखो
रंग भरी,
दिशाएँ देखो
रंग भरी चमक रहीं उमंग भरी
ये किसने फूल
फूल पे
ये किसने फूल
फूल पे किया सिंगार है
|
हिरव्या कंच धरतीवरती, निळे
निळे हे गगन
ज्याचेवरती पालखी ढगांची, उडवितसे
हा पवन
दिशा पाहा ह्या रंगल्या
दिशा पाहा ह्या रंगल्या, उमेदीने
झळाळल्या
ह्या कोणी फुलांफुलांवरती
ह्या कोणी फुलांफुलांवरती, चढविला
हा साज
|
॥
२
॥
|
तपस्वियों सी
हैं अटल ये पर्वतों की चोटियाँ
ये बर्फ़ कि
घुमेरदार घेरदार घाटियाँ
ध्वजा से ये
खड़े हुए,
ध्वजा से ये
खड़े हुए, हैं वृक्ष
देवदार के
गलीचे ये
गुलाब के, बगीचे ये बहार के
ये किस कवि
की कल्पना
ये किस कवि
की कल्पना का चमत्कार है
|
शिखरे ही पर्वतांची तपस्व्यांपरी उभी अचल,
वळणदार, वाकदार हिमगिरीचे घाट
ध्वजापरी उभे पाहा,
ध्वजापरी उभे पाहा, हे
वृक्ष देवदारचे
हे गालिचे गुलाबाचे, हे ताटवे बहारीचे
कुठल्या कवीच्या कल्पनेचा
कुठल्या कवीच्या कल्पनेचा, चमत्कार
हा
|
॥
३
॥
|
कुदरत की इस
पवित्रता को तुम निहार लो
इनके गुणों
को अपने मन में तुम उतार लो
चमका लो आज
लालिमा,
चमका लो आज लालिमा
अपने ललाट की
कण कण से
झाँकती तुम्हे, छबी विराट की
अपनी तो आँख
एक है
अपनी तो आँख एक है, उसकी हज़ार है |
निसर्गाच्या पवित्रतेस अवलोक तू जरा
त्याच्या गुणांना अंतरात थार दे जरा
लालिमा उजळून घे,
लालिमा उजळून घे, आपल्या
ललाटीचा
कणाकणानी बघतसे, तुज विश्व हे विराट
आपणास दृष्टी एकची
आपणास दृष्टी एकची, त्याला
हजार आहेत
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.