२०१५-०५-१६

गीतानुवाद-०३५: जूही की कली मेरी लाडली

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायकः सुमन कल्याणपूर
चित्रपटः दिल एक मंदिर, सालः १९६३, भूमिकाः राजेंद्रकुमार, मीना कुमारी, राजकुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८२२

धृ
जूही की कली मेरी लाडली
नाज़ों की पली मेरी लाडली
ओ आस-किरन जुग-जुग तू जीए
नन्ही सी परी मेरी लाडली
ओ मेरी लाडली
जूईची कळी माझी लाडकी
लाडात वाढली माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी

धरती पे उतर आया चँदा तेरा चहरा बना
चम्पी का सलौना गुलदस्ता तन तेरा बना
ओ मेरी लाडली
कोमल तितली मेरी लाडली
हीरे की कनी मेरी लाडली
ओ आस-किरन जुग-जुग तू जीए
नन्ही सी परी मेरी लाडली
ओ मेरी लाडली
धरतीवर उतरला चंद्र, तुझा चेहरा झाला
चाफ्याच्या फुलांचा गुच्छ तुझा मोहरा झाला
ओ माझी लाडकी
फुलपाखरू माझी लाडकी
हिरकणी शोभे माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग ए
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी

शर्माए दीवाली तारों की तेरे नैनों से
कोयल ने चुराई है पंचम तेरे बैनों से
ओ मेरी लाडली
गुड़िया सी ढली मेरी लाडली
मोहे लागे भली मेरी लाडली
ओ आस-किरन जुग-जुग तू जीए
नन्ही सी परी मेरी लाडली
ओ मेरी लाडली
लाजे दिवाळी तार्‍यांची तुझे डोळे बघून
घेतला कोकिळेने पंचम तव आलापांतून
ओ माझी लाडकी
बाहुलीपरी घडली माझी लाडकी
मला वाटे भली माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी

हर बोल तेरा सिखलाए हमें दुख से लड़ना
मुस्कान तेरी कहती है सदा धीरज धरना
ओ मेरी लाडली
गंगा की लहर मेरी लाडली
चंचल सागर मेरी लाडली
ओ आस-किरन जुग-जुग तू जीए
नन्ही सी परी मेरी लाडली
ओ मेरी लाडली
हर बोल तुझा दुःखाशी लढा आम्हा सांगे
तुझे हास्य जरासा धीर धरा आम्हा सांगे
ओ माझी लाडकी
गंगेची लहर माझी लाडकी
चंचल सागर माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग ए
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.