२०१५-०५-१७

गीतानुवाद-०३६: दिन हैं बहार के

मूळ हिंदी गीतः साहिर, संगीतः रवी, गायकः लता, रफी
चित्रपटः वक्त, सालः १९६५, भूमिकाः बलराज, सुनील दत्त

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०६११


धृ
लताः
दिन हैं बहार के, तेरे मेरे इकरार के
दिल के सहारे आजा प्यार करे
रफीः
दुष्मन हैं प्यार के जब लाखो गम संसार के
दिल के सहारे कैसे प्यार करें
लताः
दिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे
ऊत्स्फूर्ततेने, ये तू, प्रेम करू
रफीः
दुःखं लाख संसारी ह्या, शत्रू जणु की प्रेमाचे
ऊत्स्फूर्ततेने, प्रेम करावे कसे

लताः
दुनिया का बोझ जरा, दिल से उतार दे छोटीसी जिंदगी है, हस के गुजार दे
रफीः
अपनी तो जिंदगी, जीति है जी को मार के
दिल के सहारे कैसे प्यार करे
लताः
दुनियेचं ओझं तू, उतरव पाहू मनावरून
छोटेसे आयुष्य आहे, जगून घे, हसून तू
रफीः
आपले तर जीवनच, जगते मनाला मारुनच
ऊत्स्फूर्ततेने, प्रेम करावे कसे

रफीः
अच्छा नहीं होता, युंही सपनों से खेलना
बडा ही कठीन है, हकिकतों को झेलना
लताः
अपनी हकिकते, मेरे सपनों पे वार के
दिल के सहारे आजा प्यार करे
रफीः
बरे नसते मुळी, स्वप्नांशी असे खेळणे
फारच अवघड असे, बघ वास्तवास झेलणे
लताः
वास्तवास ह्या तुझ्या, माझ्या स्वप्नांवर ओवाळून
ऊत्स्फूर्ततेने, ये तू, प्रेम करू

लताः
ऐसी वैसी बातें सभी, दिल से निकाल दे
जीना है तो कश्ती को, धार पें डाल दे
रफीः
धारे की गोद में, घेरे भी हैं, मंजधार के
दिल के सहारे कैसे प्यार करे
लताः
विचार तू भलते सलते, काढून टाक मनामधून
जगायचे तर, नावेला, भर प्रवाहात लाव तू
रफीः
भर प्रवाहात असती, जप तू, गोते कमालीचे
ऊत्स्फूर्ततेने, प्रेम करावे कसे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.