२०१२-०३-३०

गीतानुवाद-००२: ऐ मेरी ज़ोहरा-ज़बीं

मूळ हिंदी गीतकारः साहिर, संगीतः रवी, गायकः मन्ना डे
चित्रपटः वक्त, सालः १९६५, भूमिका बलराज सहानी, सुनील दत्त, राज कुमार

मराठी अनुवादः  नरेंद्र गोळे २००८०३१५

धृ

मेरी ज़ोहरा-ज़बीं, तुझे मालूम नहीं
तू अभी तक है हंसीं, और मैं जवाँ
तुझपे क़ुरबान मेरी जान मेरी जान

माझे संजीवनी, तुला माहीत नाही
अजूनही तू रुचिरा, आणि मी युवा
तुझ्यावर वाहिले कधीच मी जिवा

॥१॥

ये शोखियाँ ये बाँकापन
जो तुझ में है कहीं नहीं
दिलों को जीतने का फ़न
जो तुझ में है कहीं नहीं
मैं तेरी, मैं तेरी आँखों में
पा गया दो जहाँ

ते कटाक्ष, ती चपळाई अन्
जी तुझ्यात असे, नसे कुठे
ती कला मनास  मोहवी
जी तुझ्यात असे, नसे कुठे
तुझ्या, मी तुझ्या, डोळ्यात
पावलो सर्व जगा

 

॥२॥

तू मीठे बोल जान--मन
जो मुस्कुराके बोल दे
तो धडकनों में आज भी
शराबी रंग घोल दे
सनम, सनम मैं तेरा
आशिक़--जाबिदाँ

तू मधुर जे बोल बोलशी
हसून जराही सुंदरी
तर अजूनही स्पंदने
नशेत धुंद रंगती
परी, परी, मी तुझा
कायमच ग खुळा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.