२०१३-०६-१०

गीतानुवाद-०१८: वो भूली दास्तां, लो फिर याद आ गयी


मूळ हिंदी गीतराजिन्दर किशनसंगीतमदन मोहनगायकलता
चित्रपटसंजोगसाल१९६१भूमिका: प्रदीपकुमारआनिता गुहाशुभा खोटे

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६१००१

धृ
वो भूली दास्तां लो फिर याद  गयी
नज़र के सामने घटा सी छा गयी
विसरलेली कथापुन्हा पहा आठवली
डोळ्यांपुढती जणूरात्रीगत विखुरली

कहाँ से फिर चले आये,
ये कुछ भटके हुए साये
ये कुछ भूले हुए नग़मे
जो मेरे प्यार ने गाये
ये कुछ बिखरी हुई यादें,
ये कुछ टूटे हुए सपने
पराये हो गये तो क्या
कभी ये भी तो थे अपने
 जाने इनसे क्यों मिलकर 
नज़र शर्मा गयी
कुठुनशा त्या परत आल्या,
सावल्या त्या हरपलेल्या
विसरलेली गिते काही
गायीलेली जी प्रेमाने
विखुरलेल्या ह्या आठवणी,
भंगलेली काही स्वप्ने
झाली परकी तरी पण जी
कधी होती परी आपली
 जाणे ह्यांना का भेटून
नजर ही लाजली

उम्मीदों के हँसी मेले,
तमन्नाओं के वो रेले
निगाहों ने निगाहों से,
अजब कुछ खेल से खेले
हवा में ज़ुल्फ़ लहराई,
नज़र पे बेखुदी छाई
खुले थे दिल के दरवाज़े,
मुहब्बत भी चली आई
तमन्नाओं की दुनिया पर
जवानी छा गयी
आशेचे लाघवी मेळे,
उमेदींचे ते काफिले
डोळ्यांनी डोळ्यांशी सारे,
अजबसे खेळ खेळले
केस उडले हवेवर अन्,
धुंद नजरेवरी आली
मनाची पाहुनी उघडी
कवाडेप्रेमही शिरले
आकांक्षेच्या जगावर त्या
तरूणता दाटली


बड़े रंगीन ज़माने थे,
तराने ही तराने थे
मगर अब पूछता है दिल
वो दिन थे या फ़साने थे
फ़क़त इक याद है बाकी
बस इक फ़रियाद है बाकी
वो खुशियाँ लुट गयी लेकिन
दिल-ए-बरबाद है बाकी
कहाँ थी ज़िन्दगी मेरी
कहाँ पर  गयी
किती रंगीत दिवस होते,
गितांचे ताटवे होते
विचारे मन आता हे की
दिवस होते खरे का ते?
फक्त एक याद आहे बाकी,
एक फिर्याद आहे बाकी
आटले सौख्य ते तरीही,
ध्वस्त हे हृदय आहे बाकी
कुठे हे आयुष्य होते
आले ते कुठवरी


२०१३-०६-०९

गीतानुवाद-०१७: हमने देखी है

मूळ हिंदी गीत: गुलजार, संगीत: हेमंतकुमार, गायिका: लता
सिनेमा: खामोशी, सालह १९६९, भूमिका: स्नेहलता, वहिदा रेहमान, राजेश खन्ना, धर्मेंद्र

नरेंद्र गोळे २००४ १० २०




धृ
हमने देखी है, उन आखोंकी महकती खुशबु
हाथसे छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम दो
सिर्फ़ एहसास है, यह रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो
मी तर अवलोकिलीडोळ्यांतली सुगंध-कुपी
हात लावून तिला, नात्यांचे आरोप करा
फक्त अनुभव आहे, हा आत्म्यानी अनुभूत करा
प्रेमाला प्रेम म्हणा, आणखी काही नाव द्या

प्यार कोई बोल नहीं प्यार आवाज़ नहीं
एक खामोशी है सुनती है कहा करती है
यह बुझती है ना रुकती है ठहरी है कही
 नूर की बूंद है सदीयों से बहा करती है
प्रेम काही बोल नाहीत, प्रेम आवाज नाही
निरव शांती आहे, बोलते जी अन् ऐकतेही
ही विझते मुळी, ही थांबते, ना थांबलेली
दीप्ती वाहत आहे, शतकानुशतक सारखी जी

मुस्कराहट सी खिली रहती है आंखों में कहीं
और पलकों पे उजाले से झुके रहते है
होंठ कुछ कहते नहीं काँपते होठोंपे मगर
कितने खामोश से अफ़साने रूके रहते है
स्मितहास्यासम फुललेली ती, डोळ्यात कुठे
आणि पापण्यावरी ते तेज, विखुरलेले दिसे
ओठ बोलत नाहीत पण, थरथरती आत कुठे
जणु लपवित ते, कहाण्या किती अबोल तिथे




२०१३-०६-०८

गीतानुवाद-०१६: मुस्कुरा लाडले मुस्कुरा

मूळ हिंदी गीत: शैलेंद्र, संगीत: शंकर जयकिसन, गायक: मन्ना डे
चित्रपट: जिंदगी, सालः १९६४, भूमिकाः राजेंद्रकुमार, राजकुमार, वैजयंतीमाला

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०८२३



मुस्कुरा लाडले मुस्कुरा

लाडक्या, हास रे लाडक्या



धृ
मुस्कुरा लाडले मुस्कुरा
कोई भी फू इतना नहीं खुबसूरत
है जितना ये मुखडा तेरा
लाडक्या, हास रे लाडक्या
कुठलेही फू इतके सुंदर असे
जितका आहे चेहरा तुझा

तेरी ये मुस्कान कोई छीने कभी
और फू की सेज सोए जवानी तेरी
मालिक से है ये दुआ
हे हास्य तुझे, कोणी, कधीही हरो
आणि पुष्पशय्येत, विहरो, ते यौवन तुझे
देवास, ही प्रार्थना

तुझको जो देखा, वो दिन याद आने लगे आँखों के बुझते दिये, झिलमिलाने लगे
मैं तेरे जैसा ही था
तुला पाहिले आणि ते दिस स्मरू लागले डोळ्यांच्या विझत्याशा ज्योती पुन्हा जागल्या
मी होतो तुजसारखाच

बच के तु चल, लाडले, है बुरा ये जहाँ
बनता बिगडता है, अपनाही साया यहाँ
हर कोई हैं बेवफा
तू लाडक्या चल जपून, जग हे वाईट आहे
घडते बिघडते, आपलीच छाया इथे
निष्ठा कुणी राखते