मूळ हिंदी गीत: राजिन्दर किशन, संगीत: मदन मोहन, गायक: लता
चित्रपट: संजोग, साल: १९६१, भूमिका: प्रदीपकुमार, आनिता गुहा, शुभा खोटे
मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६१००१
धृ
|
वो भूली दास्तां लो फिर याद आ गयी
नज़र के सामने घटा सी छा गयी
|
विसरलेली कथा, पुन्हा पहा आठवली
डोळ्यांपुढती जणू, रात्रीगत विखुरली
|
॥
१
॥
|
कहाँ से फिर चले आये,
ये कुछ भटके हुए साये
ये कुछ भूले हुए नग़मे
जो मेरे प्यार ने गाये
ये कुछ बिखरी हुई यादें,
ये कुछ टूटे हुए सपने
पराये हो गये तो क्या
कभी ये भी तो थे अपने
न जाने इनसे क्यों मिलकर
नज़र शर्मा गयी
|
कुठुनशा त्या परत आल्या,
सावल्या त्या हरपलेल्या
विसरलेली गिते काही
गायीलेली जी प्रेमाने
विखुरलेल्या ह्या आठवणी,
भंगलेली काही स्वप्ने
झाली परकी तरी पण जी
कधी होती परी आपली
न जाणे ह्यांना का भेटून
नजर ही लाजली
|
॥
२
॥
|
उम्मीदों के हँसी मेले,
तमन्नाओं के वो रेले
निगाहों ने निगाहों से,
अजब कुछ खेल से खेले
हवा में ज़ुल्फ़ लहराई,
नज़र पे बेखुदी छाई
खुले थे दिल के दरवाज़े,
मुहब्बत भी चली आई
तमन्नाओं की दुनिया पर
जवानी छा गयी
|
आशेचे लाघवी मेळे,
उमेदींचे ते काफिले
डोळ्यांनी डोळ्यांशी सारे,
अजबसे खेळ खेळले
केस उडले हवेवर अन्,
धुंद नजरेवरी आली
मनाची पाहुनी उघडी
कवाडे, प्रेमही शिरले
आकांक्षेच्या जगावर त्या
तरूणता दाटली
|
॥
३
॥
|
बड़े रंगीन ज़माने थे,
तराने ही तराने थे
मगर अब पूछता है दिल
वो दिन थे या फ़साने थे
फ़क़त इक याद है बाकी
बस इक फ़रियाद है बाकी
वो खुशियाँ लुट गयी लेकिन
दिल-ए-बरबाद है बाकी
कहाँ थी ज़िन्दगी मेरी
कहाँ पर आ गयी
|
किती रंगीत दिवस होते,
गितांचे ताटवे होते
विचारे मन आता हे की
दिवस होते खरे का ते?
फक्त एक याद आहे बाकी,
एक फिर्याद आहे बाकी
आटले सौख्य ते तरीही,
ध्वस्त हे हृदय आहे बाकी
कुठे हे आयुष्य होते
आले ते कुठवरी
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.