२०१३-०६-०८

गीतानुवाद-०१६: मुस्कुरा लाडले मुस्कुरा

मूळ हिंदी गीत: शैलेंद्र, संगीत: शंकर जयकिसन, गायक: मन्ना डे
चित्रपट: जिंदगी, सालः १९६४, भूमिकाः राजेंद्रकुमार, राजकुमार, वैजयंतीमाला

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०८२३



मुस्कुरा लाडले मुस्कुरा

लाडक्या, हास रे लाडक्या



धृ
मुस्कुरा लाडले मुस्कुरा
कोई भी फू इतना नहीं खुबसूरत
है जितना ये मुखडा तेरा
लाडक्या, हास रे लाडक्या
कुठलेही फू इतके सुंदर असे
जितका आहे चेहरा तुझा

तेरी ये मुस्कान कोई छीने कभी
और फू की सेज सोए जवानी तेरी
मालिक से है ये दुआ
हे हास्य तुझे, कोणी, कधीही हरो
आणि पुष्पशय्येत, विहरो, ते यौवन तुझे
देवास, ही प्रार्थना

तुझको जो देखा, वो दिन याद आने लगे आँखों के बुझते दिये, झिलमिलाने लगे
मैं तेरे जैसा ही था
तुला पाहिले आणि ते दिस स्मरू लागले डोळ्यांच्या विझत्याशा ज्योती पुन्हा जागल्या
मी होतो तुजसारखाच

बच के तु चल, लाडले, है बुरा ये जहाँ
बनता बिगडता है, अपनाही साया यहाँ
हर कोई हैं बेवफा
तू लाडक्या चल जपून, जग हे वाईट आहे
घडते बिघडते, आपलीच छाया इथे
निष्ठा कुणी राखते



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.