मूळ
हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः सुधा मल्होत्रा, गायक: मुकेश, सुधा मल्होत्रा
चित्रपट: दिदी,
सालः १९५९, भूमिकाः सुनील दत्त, जयश्री
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२०३१७
 
  | 
   धृ  सुधा: 
   | 
  
   तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको मेरी बात और है मैंने तो मुहब्बत की है 
   | 
  
   विसरलास
  मला तू तर तो
  अधिकार आहे तुला गोष्ट
  माझी वेगळी आहे मी
  तर प्रेम केले आहे 
   | 
 
 
  | 
   सुधा: 
   | 
  
   मेरे दिल की मेरे जज़बात की कीमत क्या है उलझे-उलझे से ख्यालात की कीमत क्या है मैंने क्यूं प्यार किया तुमने न क्यूं प्यार किया इन परेशान सवालात कि कीमत क्या है तुम जो ये भी न बताओ तो ये हक़ है तुमको 
   | 
  
   माझ्या
  मनाची, भावनांचीही किंमत
  काय आहे उलट्यासुलट्या
  या विचारांची किंमत
  काय आहे प्रेम
  मी का केले का
  तू ते नाही केले या
  अतित्रस्त सवालांची किंमत
  काय आहे हेही
  ना सांगसी तू तोही
  अधिकार तुझा 
   | 
 
 
  | 
   १  मुकेश: 
   | 
  
   ज़िन्दगी सिर्फ़ मुहब्बत नहीं कुछ और भी है ज़ुल्फ़-ओ-रुख़सार की जन्नत नहीं कुछ और भी है भूख और प्यास की मारी हुई इस दुनिया में इश्क़ ही एक हक़ीकत नहीं कुछ और भी है तुम अगर आँख चुराओ तो ये हक़ है तुमको मैंने तुमसे ही नहीं सबसे मुहब्बत की है 
   | 
  
   जीवन
  फक्त प्रेम नाही आणखीही
  आहे रूपकुंतलांचा
  स्वर्गच नाही आणखीही
  आहे भूकतहानेने
  व्याकुळलेल्या या
  संसारी प्रेम
  एकच नाही सत्य आणखीही
  आहे तुला
  ते बघायचे नसेल तर अधिकार
  आहे तुला मी
  तुझ्यावरच नाही सर्वांवर
  प्रेम केले आहे 
   | 
 
 
  | 
   २
 सुधा: 
   | 
  
   तुमको दुनिया के ग़म-ओ-दर्द से फ़ुरसत ना सही सबसे उलफ़त सही मुझसे ही मुहब्बत ना सही मैं तुम्हारी हूँ यही मेरे लिये क्या कम है तुम मेरे होके रहो ये मेरी क़िस्मत ना सही और भी दिल को जलाओ तो ये हक़ है तुमको 
   | 
  
   तुला
  दुनियेच्या दुःखांतून फुरसत
  नसो नसली तरी सर्वांवर
  प्रेम असो मजवर
  नसो नसले तरी मी
  तुझी आहे हे
  माझ्यासाठी काय कमी आहे तू
  माझा होऊन रहावे हे
  नसो नशिबात तरी आणखीही
  जळवशील मला तर तो
  अधिकार आहे तुला 
   | 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.