मूळ
हिंदी गीत: वर्मा मलिक, संगीत: कल्याणजी-आनंदजी, गायक: किशोरकुमार
चित्रपट:
हम तुम और वो, साल: १९७१, भूमिका: विनोद खन्ना, भारती
मराठी
अनुवाद: नरेंद्र गोळे २००६०५२२
॥
धृ
॥
|
प्रिये प्राणेश्वरी, हृदयेश्वरी
यदी आप हमे आदेश करे
तो प्रेम का हम श्रीगणेश करे |
प्रिये प्राणेश्वरी, हृदयेश्वरी
जर तू आज्ञा मजसी देशी
मी प्रेमारंभ करेन खचित |
॥
१
॥
|
ये चक्षू तेरे चंचल चंचल
ये कुंतल भी शामल शामल
ये अधर धरे जीवनज्वाला
ये रूपचंद्र शीतल शीतल
ओ कामिनी प्रेमविशेष करे |
हे चक्षू तुझे चंचल, चंचल
हे कुंतलही शामल, शामल
हे अधर धरती जीवनज्वाला
हे रूप चांद्र, शीतल, शीतल
तू कामिनी, प्रेम विशेष करी |
॥
२
॥
|
हो संचित पुण्यों की आशा
सुन व्यथित हृदय की मृदू भाषा
सर्वस्व समर्पण कर दे हम
करो पूर्ण हमारी अभिलाषा
गजगामिनी दूर हर क्लेष करे |
संचित पुण्यांची असो आशा
श्रव, व्यथित हृदिची मृदू भाषा
सर्वस्व तुला करतो अर्पण
कर पूर्ण तू माझी अभिलाषा
गजगामिनी दूर हर क्लेष करी |
॥
३
॥
|
हम भ्रमर नहीं इस यौवन के
हम याचक हैं मन उपवन के
हम भावपुष्प कर दे अर्पण
साकार करो सपने मन के
मन मोहिनी मन में प्रवेश करे |
मी भ्रमर नसे तारुण्याचा
मी याचक असे मन उपवनीचा
मी भावपुष्प करी तुज अर्पण
साकार करी स्वप्ने मनीची
मन मोहिनी कर तू प्रवेश मनी |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.