२०२१-०५-२२

गीतानुवाद-२०१: रंग और नूर की बारात किसे पेश करूँ

चित्रपटः गज़ल, सालः १९६४, भूमिकाः सुनील दत्त, मीना कुमारी
मू हिंदी गीतकारः साहिर, गायकः रफ़ी, संगीतः मदन मोहन

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००९१२२३

धृ

रंग और नूर की बारात किसे पेश करूँ
ये मुरादों की हंसीं रात किसे पेश करूँ

रंग आणि दीप्तीचे उन्मेष मी कुणा देऊ
सूप्त इच्छांची सुरस रात मी कुणा देऊ 

मैने जज़बात निभाए हैं उसूलों की जगह
अपने अरमान पिरो लाया हूँ फूलों की जगह
तेरे सेहरे की ये सौगात किसे पेश करूँ

तत्त्वांच्या जागी जपल्यात भावनाही मी
फुलांच्या जागी ओवल्यात इच्छाही मी
तुझ्या मुकुटाची ही भेट मी कुणा देऊ 

ये मेरे शेर मेरे आखिरी नज़राने हैं
मैं उन अपनों मैं हूँ जो आज से बेगाने हैं
बेत--लुख़ सी मुलाकात किसे पेश करूँ

हे माझे काव्य माझी भेट अखेरची आहे
आज जे परके आहेत त्यांतलाच मी आहे
बिनासंदर्भ मुलाखत ही मी कुणा देऊ 

सुर्ख जोड़े की तबोताब मुबारक हो तुझे
तेरी आँखों का नया ख़्वाब मुबारक हो तुझे
ये मेरी ख़्वाहिश ये ख़यालात किसे पेश करूँ

रक्त वस्त्रांचा तुला साज शुभंकर होवो
तुझ्या नेत्रीचे नवे स्वप्न शुभंकर होवो
माझी इच्छा नी हे विचार मी कुणा देऊ 

कौन कहता है चाहत पे सभी का हक़ है
तू जिसे चाहे तेरा प्यार उसी का हक़ है
मुझसे कह दे मैं तेरा हाथ किसे पेश करूँ

कोण म्हणतो सगळ्यांना हक्क आवडीचा
तुझ्या आवडत्या व्यक्तीला हक्क निवडीचा
तू मला सांग तुझा हात मी कुणा देऊ

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=CZmSgtSq9T8

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.