२०२१-०५-१०

गीतानुवाद-१९३: दिल एक मंदिर है

मूळ हिंदी गीतकार: हसरत जयपुरी, संगीत: शंकर जयकिसन, गायक: रफी, सुमन
चित्रपट: दिल एक मंदिर है, साल: १९६३, भूमिका: राजेंद्रकुमार, राज कपूर, मीनाकुमारी 

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००७०१११

प्रस्ताव

जाने वाले कभी नहीं आते
जाने वाले की याद आती है

निघून गेलेले कधी न येती
गेलेल्याची आठवण येते

धृ

दिल एक मंदिर है
दिल एक मंदिर है
प्यार की जिसमें
होती है पूजा
ये प्रीतम का घर है

मन एक मंदिर आहे
मन एक मंदिर आहे
प्रेमाची जिथे
होतसे पूजा
हे प्रियतमाचे घर आहे

हर धड़कन है आरती वंदन
आँख जो मींची हो गए दर्शन
मौत मिटा दे चाहे हस्ती
याद तो अमर है

हर स्पंदन आहे आरती वंदन
डोळे मिटता होई तव दर्शन
मृत्यू मिटवू दे देहा परंतु
आठवण तर अमर आहे

हम यादों के फूल चढ़ाएँ
और आँसू के दीप जलाए
साँसों का हर तार पुकारे
ये प्रेम-नगर है

आठवणींची फुले वाहू आम्ही
आणि अश्रुंचे दीप उजळू या
श्वासांची हर तार पुकारे
हे प्रेम नगर आहे


https://www.youtube.com/watch?v=1T-qirzPCXs

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.