२०२१-०५-१८

गीतानुवाद-१९९: यूँही तुम मुझसे बात करती हो

मूळ हिंदी गीतः इंदीवर, संगीतः कल्याणजी-आनंदजी, गायकः लता, रफी
चित्रपटः सच्चा-झूठा, सालः १९७०, भूमिकाः राजेश खन्ना, मुमताज, विनोद खन्ना 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८१८

 

धृ

यूँही तुम मुझसे बात करती हो
     
या कोई प्यार का इरादा है

र:

अशाच तू मजशी गप्पा करशी का
की काही प्रेमाचा उद्देश आहे

 

अदाए दिल की जानता ही नहीं
     
मेरा हमदम भी कितना सादा है

ल:

मनाच्या हरकती जाणतच नाही
माझा साजण हा किती साधा आहे

रोज़ आती हो तुम ख़यालों में
     
ज़िंदगी में भी मेरी आ जाओ
     
बीत जाए न ये सवालों में
      
इस जवानी पे कुछ तरस खाओ

र:

रोज येतेस मम विचारांतून
जीवनीही माझ्या ये ना सये
या चर्चेतच न संपो जीवन हे
करुणा यौवनाची जरा कर तू

 

हाल-ए-दिल समझो सनम
     
मुँह से न कहेंगे हम
     
हमारी भी कोई मर्यादा है

ल:

मनस्थिती जाणून घे
स्पष्ट मी बोलणार नाही
माझ्याही काही मर्यादा आहेत

भोलेपन में है वफ़ा की खुशबू
      
इसपे सब कुछ न क्यूँ लुटाऊँ मैं
      मेरा बेताब दिल ये कहता है
      
तेरे साए से लिपट जाऊँ मैं

ल:  

निरागसतेत आहे निष्ठेचा सुगंध
त्यावर सर्वस्व का न ओवाळू
माझे बेकाबू मन हे सुचवे की
तुझ्या सावलीसही कवेत घेऊ

 

मुझसे ये मेल तेरा
     
न हो इक खेल तेरा
     
ये करम मुझपे कुछ ज़ियादा है

र:  

मजसवे संग तुझा
न ठरो डाव तुझा
कृपा मजवर ही अतीच होतेय

बन गई हो मेरी सदा के लिये
     
या मुझे यूँ ही तुम बनाती हो
     कहीं बाहों में न भर लूँ तुमको
     
क्यों मेरे हौसले बढ़ाती हो

र:

नेहमीकरता तू माझी झालीस का
की नुसतीच मज रिझवत आहेस
कधी सजणे न मिठी तुज मारू
कशाला धीर माझा वाढवशी

 

हौसले और करो
    
पास आते न डरो
    
दिल न तोड़ेंगे अपना वादा है

ल:

धीर आणखीही वाढव
भेटण्या भीऊ नको
मन न मोडेन हे वचन देते

https://www.youtube.com/watch?v=U-YQkFTi1Zk

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.