२०२१-०५-०४

गीतानुवाद-१९०: हम जब सिमट के

मूळ हिंदी गीतकार: साहिर, संगीत: रवी, गायक: आशा भोसले, महेंद्र कपूर
चित्रपट: वक्त, साल: १९६५, भूमिका: सुनील दत्त, साधना 

मराठी अनुवाद:  नरेंद्र गोळे २०१३०७०५

धृ

हम जब सिमट के आप की बाहों में आ गये
लाखो हसिन ख्वाब निगाहों में आ गये

जेव्हा मिठीत मी तुझ्या, सजणा विसावले
लाखो सुरेख स्वप्नसर नयनांत दाटले

खुशबू चमन को छोड के सासों में घुल गयी
लहरा के अपने आप जवाँ जुल्फ खुल गयी
हम अपने दिसपसंद पनाहों में आ गये

फुलास सोडून गंध हे, श्वासांत मिसळले
लहरून केस हे युवा, आपोआप विखुरले
मीही खुलून आवडीच्या मस्तीत प्रकटले

कह दी है दिल की बात नजरों के सामने
इकरार कर लिया है, बहारों के सामने
दोनो जहाँ आज गवाहों में आ गये

डोळ्यांसमोर बोलले आहे मी मनाचे गूज
होकार मी दिला आहे, साक्षी बहर करून
होऊन दोन्हीही जगे साक्ष, धन्य जाहले

मस्ती भरी घटाओं की परछाईयों तले
हाथों मे हाथ थाम के जब साथ हम चले
शाखाओं से फूल टूट के राहों में आ गये

मस्तीने मत्त मेघांच्या सावली तळी
हातात हात घेऊनी आम्ही संगतीने चाललो
फांदिची सुटून फुले मार्ग खूप शोभले   


https://www.youtube.com/watch?v=G-VYzHdZMyY

https://www.youtube.com/watch?v=G-VYzHdZMyY

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.