२०२१-०५-१२

गीतानुवाद-१९४: बूझ मेरा क्या नाम रे

मूळ हिंदी गीतः मजरूह, संगीतः ओ.पी. नय्यर, गायकः शमशाद
चित्रपटः सी.आय.डी., सालः १९५६, भूमिकाः देव आनंद, शकीला 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०६२७


धृ

बूझ मेरा क्या नाम रे
नदी किनारे गाँव रे
पीपल झूमे मोरे आँगना
ठण्डी ठण्डी छाँव रे

ओळख माझे नाव रे
नदी किनारे गाव रे
पिंपळ डोले माझ्या अंगणी
सावली थंडगार रे

लोग कहे मुझे बाँवरी
मेरे उलझे उलझे बाल
मेरा काला काला तिल है
मेरे गोरे गोरे गाल
मैं चली जिस गली
झूमे सारा गाँव रे

म्हणती लोक मला खुळी
गुंतले माझे केस रे
काळा काळा तिळ गालावर
गोरे गोरे गाल रे
जाते मी जिथे कुठे
तिथे नाचे सारा गाव रे

दिल वालों के बीच में
मेरी अखियाँ हैं बदनाम
हूँ एक पहेली फिर भी
कोई बूझे मेरा नाम
मैं चली मनचली
सबका मन ललचाऊँ रे

दिलखुलास लोकांत रे
माझे डोळे बदनाम रे
एक उखाणा मीच असे कुणी
ओळखा माझे नाव रे
चालले मनमस्त मी
सगळ्यांना मोहून पार रे

 

https://www.youtube.com/watch?v=gss5sIpouJg

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.