२०२१-०५-०३

गीतानुवाद-१८९: ये जिन्दगी उसी की है

मूळ हिंदी गीतः राजिंदर कृष्ण, संगीतः सी. रामचंद्र, गायिकाः लता मंगेशकर
चित्रपटः अनारकली, सालः १९५३, भूमिकाः प्रदीप कुमार, बीना रॉय, कुलदीप कौर, नूरजहाँन 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२०११२६

धृ

ये ज़िन्दगी उसी की है
जो किसी का हो गया
प्यार ही में खो गया

हे जीवन त्याचेच आहे
जो कुणाचा जाहला
प्रेमामध्ये गुंतला

ये बहार, ये समा
कह रहा है प्यार कर
किसी की आरज़ू में अपने
दिल को बेक़रार कर
ज़िन्दगी है बेवफ़ा
लूट प्यार का मज़ा

ही बहार, हा ऋतू
सांगतो की प्रेम कर
कुणाच्या आवडीत आपला
जीव तू अस्वस्थ कर
जीवन एकनिष्ठ ना
लूट प्रीतीची मजा

धड़क रहा है दिल तो क्या
दिल की धड़कनें ना गिन
फिर कहाँ ये फ़ुर्सतें
फिर कहाँ ये रात-दिन
आ रही है ये सदा
मस्तियों में झूम जा

स्पंदते हृदय तर काय
स्पंदने त्याची न गण
पुढे न संधी सापडे
पुढे कुठे हे रात-दिन
ऐकू ये संदेश हा
धुंदीमधेच नाच जा

जो दिल यहाँ न मिल सके
मिलेंगे उस जहान में
खिलेंगे हसरतों के फूल
जा के आसमान में
ये ज़िन्दगी चली गई
जो प्यार में तो क्या हुआ

जी मने इथे न भेटली
भेटू तिथे जगात त्या
इच्छांची उमलतील फुले
जाऊनी आकाशात त्या
प्रेमात हे आयुष्य जरी
संपले तर मोठं काय

सुनाएगी ये दास्तां
शमा मेरे मज़ार की
फ़िज़ा में भी खिली रही
ये कली अनार की
इसे मज़ार मत कहो
ये महल है प्यार का

ऐकवेल ही कथा
ज्योत मम चिर्‍यातली
बहारीतही उमललेलीच
असे डाळिंबी ही कळी
थडगे ह्यास म्हणू नका
महाल हा मम प्रीतीचा

ऐ ज़िंदगी की शाम आ
तुझे गले लगाऊं मैं
तुझी में डूब जाऊं मैं
जहां को भूल जाऊं मैं
बस इक नज़र
मेरे सनम अल्विदा
अल्विदा

हे सांजे आयुष्याचे ये
गळ्यास तुज मी लावते
तुझ्यात विरून जात मी
जगास विसरू पाहते
फक्त एक कटाक्ष
साजणा तुज रामराम
रामराम

 

https://www.youtube.com/watch?v=K5r0ZMvbSag

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.