२०२१-०५-०८

गीतानुवाद-१९१: अब क्या मिसाल दूँ

मूळ हिंदी गीतः मजरूह, संगीतः रोशन, गायकः लता, रफी
चित्रपटः आरती, सालः १९६३, भूमिकाः मीना कुमारी, अशोक कुमार, प्रदीप कुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८१०

धृ

अब क्या मिसाल दूँ मैं तुम्हारे शबाब की
इनसान बन गई है किरण माहताब की

उपमा कशाची देऊ तुझ्या यौवनास मी
चांदणेच उतरले जणू मनुरूप घेऊनी

चेहरे में घुल गया है हसीं चाँदनी का नूर
आँखों में है चमन की जवाँ रात का सुरूर
गरदन है एक झुकी हुई डाली गुलाब की

चेहर्‍यात उसळले हे रम्य चांदण्याचे तेज
डोळ्यांत झळकते युवा रातीची उमेद
झुलती गुलाब डौले, झुले मान तुझी तशी

गेसू खुले तो शाम के दिल से धुआँ उठे
छूले कदम तो झुक के न फिर आस्माँ उठे
सौ बार झिलमिलाये शमा आफ़ताब की

झाले खुले जर केस, तर का सांज धुसफुसे
आकाश चरणी जर झुके, पुन्हा  न उठू शके
सूर्याची ज्योत टिमटिमे, काळ्या बटांतुनी

दीवार--दर का रंग, ये आँचल, ये पैरहन
घर का मेरे चिराग़ है बूटा सा ये बदन
तसवीर हो तुम्हीं मेरे जन्नत के ख़्वाब की

हा घराचा रंग, ही सुरवार, हा पदर
माझ्या घरीची दिपकळी हे तुझे यौवन
स्वप्नातील स्वर्गपरी जणू तू सखे खरी  


https://www.youtube.com/watch?v=ad5BcGFpxog

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.