२०२१-०५-१३

गीतानुवाद-१९६: आप यूँ ही अगर हमसे मिलते रहे

मूळ हिंदी गीतकारः एस. एच. बिहारी, संगीतः ओ. पी. नय्यर, गायकः रफी, आशा
चित्रपटः एक मुसाफिर एक हसीना, सालः १९६२, भूमिकाः साधना, जॉय मुखर्जी 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००९०२०२

धृ

आप यूँ ही अगर हमसे मिलते रहे
देखिए एक दिन प्यार हो जाएगा

र:

तू अशीच राहिलीस भेटतच जर मला
ग असेच एक दिस प्रेम होऊन जाईल

 

ऐसी बातें न कर ऐ हसीं जादूगर
मेरा दिल तेरी नज़रों में खो जाएगा

आ:

रे अशा जादुगारा न कर गोष्टी तू
माझे मन तुझ्या दृष्टीत हरपून जाईल

पीछे-पीछे मेरे आप आतीं हैं क्यों
मेरी राहों में आँखें बिछाती हैं क्यों
आप आती हैं क्यों?

र:

मागे मागे माझ्या ग तू येतेस का?
माझ्या वाटेवरी लावसी दृष्टी का?
ग तू येतेस का?

 

क्या कहूँ आपसे ये भी एक राज़ है
एक दिन इसका इज़हार हो जाएगा

आ:

काय सांगू तुला, हे आहे रहस्य एक
एके दिनी त्याचा उच्चार होऊन जाईल

कैसी जादूगरी की अरे जादूगर
तेरे चहरे से हटती नहीं ये नज़र
है ये नज़र

र:

कशी केलीस जादू अगं माझ्यावर
तुझ्या चेहर्‍यावरून ना हटे ही नजर
ना हटे ही नजर

 

ऐसी नज़रों से देखा अगर आपने
शर्म से रँग गुलनार हो जाएगा

आ:

ऐशा नजरेने बघशी मला तू अगर
लाजेने माझा रंगच गुलाबी होईल

मैं मोहब्बत की राहों से अंजान हूँ
क्या करूँ क्या क्या करूँ परेशान हूँ
मैं परेशान हूँ

र:

नाही प्रेमाच्या वाटेला मी ओळखत
काय करू काय करू झालो हैराण मी
झालो हैराण मी

 

आपकी ये परेशानियाँ देखकर
मेरा दिल भी परेशान हो जाएगा

आ:

ही तुझी त्रेधा तिरपिट मी पाहता
माझेही मन खरच त्रस्त होईल की


https://www.youtube.com/watch?v=d6xqrLzZXK4

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.