२०२१-०५-२१

गीतानुवाद-२००: तेरा जलवा जिसने देखा

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर-जयकिशन, गायिकाः लता
चित्रपटः उजाला, सालः १९५९, भूमिकाः कुमकुम, राजकुमार 

नरेंद्र गोळे २०२१०५२१

धृ

तेरा जलवा जिसने देखा वो तेरा हो गया
मैं हो गई किसी की, कोई मेरा हो गया
क्या देखा था तुझमें, दिल तेरा हो गया
ये सोचते ही सोचते सवेरा हो गया

तुझा तोरा पाहिलेला होऊन तुझा राहिला
मी झाले रे कुणाची कुणी माझा झालेला
काय पाहिले तुझ्यात मी की तुझी झाले रे
या विचारांत गुंतून रात्रभर मी गेले रे

है मुझमें भी ऐसा अनोखा सा जादू
जो देखे वो होता है दिल से बेक़ाबू
लगे तोसे नैना, तो नैना ना लागे
ख़्यालों में डूबी हूँ, तेरे ओ बाबू
तू आया तो महफ़िल में उजाला हो गया
मैं हो गई कोई मेरा हो गया

माझ्यातही आगळीच आहे रे अशी जादू
जो पाहिल त्याचे मन होत असे बेकाबू
नजर भेटे तुजला, तर डोळे ना मिटती
विचारांत तुझ्या मी हरवले रे बाबू
तू आलास मैफलीत या उजाळा झालेला
मी झाले रे कुणाची कुणी माझा झालेला

तेरी इक झलक ने वो हालत बना दी
मेरे तन-बदन में मुहब्बत जगा दी
कभी भूलकर कोई इधर बहते पानी
किनारे पे रहती हूँ फिर भी मैं प्यासी
अब दिल का क्यों करें ग़म, गया सो गया
मैं हो गई कोई मेरा हो गया

तुझ्या एका दिसण्याने केली अशी हालत
माझ्या तन-मनात जागवली रे प्रीती
चुकून कधी इकडे वाहते रे पाणी
किनार्‍यावर राहे तरी मी अतृप्त
शोक मनाचा करु काय, गहाळ ते झालेले
मी झाले रे कुणाची कुणी माझा झालेला

बुलाती है तुझको ये आँचल की छैय्याँ
ज़रा मुस्कुरा दे, पड़ूँ तोरे पैय्यां
क़सम है तुझे दिल की जान-ए-तमन्ना
तुझे हमने माना है अपना ही सैय्याँ
मैं अकेली और तेरा ज़माना हो गया
मैं हो गई कोई मेरा हो गया

पुकारे तुला ही बघ पदराची छाया
जरा हस पडू का मी त्याकरता पाया
शपथ आहे तुला माझ्या जीवाच्या जीवा
तुला मानलेले सखा मी प्राणनाथा
एकटी मी आणि जग हे बघ तुझे झाले रे
मी झाले रे कुणाची कुणी माझा झालेला


https://www.youtube.com/watch?v=KVLvnK4VlGc

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.