२०२१-०५-१८

गीतानुवाद-१९८: आधा है चंद्रमा

मूळ हिंदी गीत: भरत व्यास, संगीत: रामचंद्र चितळकर, गायक: महेंद्र कपूर, आशा
चित्रपट: नवरंग, सालः १९५९, भूमिका: संध्या 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे

 

धृ

आधा है चंद्रमा, रात आधी

रह न जाए, तेरी मेरी बात आधी

अष्टमीचा चंद्र हा आणि रात्र अपुरी

राहो न तुझी माझी, मुलाखत ही अधुरी

पिया आधी है प्यार की भाषा

आधी रहने दो मन की अभिलाषा
आधे छलके नयन, आधे छलके नयन

आधे पलकों में भी है बरसात आधी

प्रिया अधुरी आहे प्रेमाची भाषा

राहो अपुरीच मनची अभिलाषा
अर्धे मिटले नयन, उदित अर्धे नयन

सार्द्र नयनांची आहे वर्षाही अधुरी

आस कब तक रहेगी अधुरी

प्यास होगी नहीं क्या ये पुरी
प्यासा प्यासा गगन, प्यासाप्यासा चमन

प्यासे तारों की निकली बारात आधी

अपुरी राहील कुठपर्यंत ही आस

तृप्त होणे नाही का ही आस
तहानलेले गगन, तहानले उपवन

तहानेल्या ताऱ्यांची वरात अधुरी

सुर आधा ही शाम ने साधा

रहा राधा का प्यार भी आधा
नैन आधे खिले, होठ आधे हिले

रही मन में मिलन की वो बात आधी

सुर कृष्णाने साधला अपुरा

रास राधेचा राहिला अपुरा
नेत्र अर्धोन्मिलित, ओठ अर्धे उदित

मनीच राहे प्रीतीची ही गोष्ट अपुरी

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.