२०२१-०३-३१

गीतानुवाद-१८८: आँसू भरी हैं ये जीवन की राहे

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः दत्ता राम, गायकः मुकेश
चित्रपटः परवरीश, सालः १९५८, भूमिकाः राज कपूर, माला सिन्हा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००९१६

धृ

आँसू भरी हैं ये जीवन की राहें
कोई उनसे कह दे हमें भूल जाएं

अश्रूपुरे आहेत हे पथ जीवनाचे
सांगा कुणी तिज, ’विसर तू मला गे’

वादे भुला दें क़सम तोड़ दें वो
हालत पे अपनी हमें छोड़ दें वो
ऐसे जहाँ से क्यूँ हम दिल लगाएं
कोई उनसे कह दे हमें भूल जाएं

विसरो ती वचने, शपथ मोडू दे ती
मला माझ्या हालावरच सोडू दे ती
अशा या जगावर मी का लुब्ध व्हावे
सांगा कुणी तिज, ’विसर तू मला गे’

बरबादियों की अजब दास्ताँ हूँ
शबनम भी रोए मैं वो पासबाँ हूँ
उन्हें घर मुबारक हमें अपनी आँहें
कोई उनसे कह दे हमें भूल जाएं

हरत्या विनाशाची चित्तरकथा मी
संगतीत रडकुंडी ये फूल, तो मी
तिला लाभू दे घर, निश्वास मज हे
सांगा कुणी तिज, ’विसर तू मला गे’

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=9UE-LcQ5NNg

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.