मूळ हिंदी गीतः केदार शर्मा, संगीतः रोशन, गायकः गीता
दत्त, मुकेश
चित्रपटः बावरे नैन, सालः १९५०,
भूमिकाः राज कपूर, गीता दत्त
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०७१८
धृ
|
ख़यालों में किसी के इस तरह आया नहीं करते किसी को बेवफ़ा आ आ के तड़पाया नहीं करते दिलों को रौंद कर दिल
अपना बहलाया नहीं करते जो ठुकराए गए हों उनको ठुकराया नहीं करते
|
गीता:
मुकेश:
|
विचारांतही कुणाच्या असे येऊ नये कोणी कृतघ्ने येऊ येऊनी तळमळवू नये कोणी हृदये तुडवून इतरांची मन न रमवावे कधी कोणी जे ठोकरले आहेत आधीच तयांना ठोकरू नये कोणी
|
१
|
हँसी फूलों की दो दिन चाँदनी भी चार दिन की है मिली हो चाँद सी सूरत तो इतराया नहीं करते जिन्हें मिटना हो वो मिटने से डर जाया नहीं
करते मुहब्बत करने वाले ग़म से घबराया नहीं करते
|
गीता:
गीता:
|
सुंदर फुलांची ऐट दो दिसांची चांदणेही चारच दिवसांचे मिळाले चंद्रमुख तरीही एवढे शेफारू नये कोणी ज्यांना संपायचे आहे ते तयाने घाबरत नाहीत दुःखाला प्रेम करणारे मुळिही घाबरत नाहीत
|
२
|
मुहब्बत का सबक सीखो ये जाकर जलनेवालों से के दिल की बात भी लब तक कभी लाया नहीं करते
|
मुकेश:
|
प्रेमाचा पाठ हा घ्यावा जळत्यांकडेच जाऊनी मनातील गोष्टही कधीही मुखी आणू नये कोणी
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.