मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायकः लता,
मन्ना डे
चित्रपटः श्री ४२१०, सालः १९५५, भूमिकाः राज कपूर, नर्गीस,
नादिरा
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४१२१६
धृ
|
प्यार हुआ, इक़रार हुआ है प्यार से फिर क्यूँ डरता है
दिल? कहता है दिल,
"रस्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ
मंज़िल"
|
प्रेम झाले, मंजूर झाले तरी मन का त्याला घाबरते? म्हणते हे मन, “रस्ता आहे कठीण” माहीत नाही कुठे आहे ईप्सित”
|
१
|
कहो कि अपनी प्रीत का गीत ना बदलेगा कभी तुम भी कहो,
"इस राह का मीत ना बदलेगा कभी" प्यार जो टूटा, साथ जो टूटा, चाँद ना चमकेगा कभी
|
बोल तू आपल्या प्रीतीचे गीत न मुळि बदलेल कधी बोल तू ही, “या वाटेची साथ न मुळि बदलेल कधी” प्रेम मोडता, साथ सोडता, चंद्र पुन्हा न दिसेल कधी
|
२
|
रातें दसों दिशाओं से कहेंगी अपनी कहानियाँ गीत हमारे प्यार के दोहराएँगी जवानियाँ मैं ना रहूँगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेंगी निशानियाँ
|
रात्री दहा दिशांतूनी आपापल्या वदतील कथा गीत आमच्या प्रीतीचे गातील पुन्हा नव्या पिढ्या राहीन मी ना, राहशील तू ना राहतील तरिही याच खुणा
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.